काँग्रेसच्या ‘या’ माजी आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी, कारण अजूनही गुलदस्त्यात

पटोले यांनी पदाची सूत्रे हाती घेण्याआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. (MLA Ashif Shaikh congress NCP)

काँग्रेसच्या 'या' माजी आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी, कारण अजूनही गुलदस्त्यात
असिफ शेख

नाशिक :  राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही नुकतेच बदलण्यात आले असून माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. पक्षाने कात टाकावी तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये हा बदल झाले. मात्र, असे असले तरी पटोले यांनी पदाची सूत्रे हाती घेण्याआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मालेगावमधील माजी आमदार असिफ शेख (Ashif Shaikh) यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी नवनिर्वाचित प्रेदशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामासुद्धा पाठवला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण अजून गुलदस्त्यात असून ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. (former congress MLA Ashif Shaikh resigned from congress party, will join NCP)

वडील रशीद शेख काँग्रेसचे निष्ठावंत

राज्यात आगामी निवडणुका तसेच पक्षीय बांधणी लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. पक्षाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्य़क्षपदही बदलले. मात्र, असे असले तरी मालेगाव येथील माजी आमदार असिफ शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपला राजीनामा नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे. असिफ शेख यांचे वडील रईस शेखसुद्धा काँग्रेसचे माजी आमदार आहेत. ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. असिफ शेख यांच्या अचानपणे राजीनामा देण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. असिफ यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप समजून शकलेले नाही.

राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची चर्चा

असिफ शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसला अचानकपणे सोडचिठ्ठी दिल्यामुळे राजकीय गोटातून अनेक तर्क बांधण्यात येत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार असिफ शेख हे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आगामी काळात असिफ शेख यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. तसेच, असिफ शेख यांच्यानंतर काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष यांच्यापुढे पक्षगळती थांबवण्याचे मोठे आव्हान असल्याचे सांगितले जात आहे.

 


संबंधित बातम्या :

भाजपच्या पुण्यातील 19 नगरसेवकांच्या पक्षांतराची चर्चा, अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांच्या सुरात सूर

भाजपला आणखी एक झटका?, पुण्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार; अजितदादांशी खलबतं!

(former congress MLA Ashif Shaikh resigned from congress party, will join NCP)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI