AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॅथॉलॉजी टेस्टची संकेतस्थळाच्या माध्यमातून घरपोच सेवा; मुंबई, दिल्लीनंतर नाशिकमध्ये उपक्रम

अतिशय अद्ययावत 'लॅबडोअर डायग्नोस्टिकचा' शुभारंभ अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते पार पडला.

पॅथॉलॉजी टेस्टची संकेतस्थळाच्या माध्यमातून घरपोच सेवा; मुंबई, दिल्लीनंतर नाशिकमध्ये उपक्रम
नाशिकमध्ये घरपोच पॅथलॅब सुविधीचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 1:19 PM
Share

नाशिकः नाशिकच्या युवकांनी कोविड काळात सुरू केलेली ‘घरपोच पॅथलॅब टेस्ट’ संकल्पना कोरोना संकटाच्या काळात नागरिकांसाठी अत्यंत उपयोगी आणि आधार देणारी ठरली. फक्त नाशिकच नव्हे तर पुणे, मुंबई, मनमाड, मालेगाव, सिन्नर,चांदवड अशा सर्व शहरात घरपोच मिळणारी ही सेवा लोकांना खूप मोलाची ठरली. याच सेवेची गरज ओळखून अत्यंत माफक दरात पॅथॉलॉजी टेस्ट उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय अद्ययावत ‘लॅबडोअर डायग्नोस्टिकचा’ शुभारंभ अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते पार पडला.

याप्रसंगी बोलताना भुजबळ यांनी उपस्थित नागरिकांना आरोग्य व पॅथॉलॉजी टेस्ट चे महत्व समजावून सांगितले. यावेळी भुजबळ म्हणाले की, राहुल निकम व अजय शेलार या दोन तरुणांनी एकत्र येऊन मुंबई व दिल्ली नंतर नाशिकमध्ये प्रथमच अशा संकल्पनेला सुरुवात केली आहे. नाशिक शहर व परिसरातील नागरिकांसाठी संकेतस्थळ माध्यमातून घरपोच पॅथलॅब सुविधा मिळाव्यात यासाठी सदर संकल्पनेला सुरुवात केली आहे. हे तरुण सकाळी सहा वाजेपासून घरपोच सॅम्पल गोळा घेण्यास सुरुवात करतात. याचा अधिक फायदा सर्वसामान्यांना घरपोच मिळतोय. तसेच या चाचणीचा अहवाल त्या रुग्णाला त्याच्या घरी ई-मेल तसेच व्हाट्सएपच्या माध्यमातून मिळाल्यामुळे अत्यंत कमी वेळात मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी दरही कमी ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा मिळेल आणि ज्यात लक्षण जाणवत नाही अशा काही आजारांचे देखील निदान या चाचणी अहवालातून होणार असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी संगितले. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना या चाचण्या मार्गदर्शक म्हणून काम करतील. www.arlabdoor.com या संकेतस्थळावर नोंदणी करून अथवा 7058555470 या क्रमांकावर संपर्क साधून घरपोच सेवा मिळवून आपल्या आरोग्यासंदर्भात असलेल्या सर्व चाचण्या करवून घेण्याचे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेविका तथा स्थायी समिती अध्यक्ष प्रतिभाताई पवार, जिल्हा महिला सरचिटणीस स्वातीताई बिडला, येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मनमाडचे नगराध्यक्ष गणेश धात्रक, समता परिषदेचे प्रदेश प्रचारक प्रा. ज्ञानेश्वर दराडे, नाशिक शहरातील नामांकित एमडी पॅथॉलॉजीस्ट डॉ. अजित जुनागडे, मच्छिंद्र शेलार, विलास निकम, मराठा उद्योजक लॉबीचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चिंतेश्वर देवरे, युवा उद्योजक विवेक राहणे, लॅबडोअरचे संचालक राहुल निकम व अजय शेलार व लॅबडोअरची संपूर्ण महाराष्ट्रातील मॅनेजमेंट यावेळी उपस्थित होते.

इतर बातम्याः

एकाच दिवशी तब्बल 24 लाखांचे वीजबिल भरून जळगावचे 13 शेतकरी कृषिपंप थकबाकीतून मुक्त

शेतकऱ्यांना दिलासा; नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 10 नव्हे फक्त 3 दिवस बंद

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.