AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये ऑक्सिजनची तिप्पट वाढ करण्याच्या सूचना; संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी

नाशिकमध्ये (Nashik) कोरोनाच्या (corona) तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात आरोग्य सुविधांसह ऑक्सिजनची (oxygen) तीन पट व्यवस्था करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी (22 सप्टेंबर) केल्या आहेत.

नाशिकमध्ये ऑक्सिजनची तिप्पट वाढ करण्याच्या सूचना; संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी
नाशिक महसूल विभागाची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बैठक घेतली.
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 5:51 PM
Share

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) कोरोनाच्या (corona) तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात आरोग्य सुविधांसह ऑक्सिजनची (oxygen) तीन पट व्यवस्था करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी (22 सप्टेंबर) केल्या आहेत. (Instructions for triple supply of oxygen in Nashik; An increase of 107 new corona patients in the district)

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात नाशिक महसूल विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत केलेल्या कामांची आढावा बैठक राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला नाशिकचे विभागीय आयुक्त राधागृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, नंदुरबारचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नाशिक जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अहमदनगर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, धुळे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जळगावचे अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपायुक्त (नियोजन) प्रशांत पोतदार, उपायुक्त (महसूल) गोरक्ष गाडीलकर आणि जिल्ह्याचे नियोजन अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाला प्राधान्य द्या

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुंषगाने बालकांसाठी आयसीयू बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन व इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा वार्षिक योजना व नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करताना प्रथम प्राधान्य कोविड विषयक बाबींना देण्याबरोबरच जनतेच्या हिताच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच कायमस्वरुपी मालमत्ता तयार होऊन त्याचा फायदा अनेक वर्ष होईल अशा स्वरुपाची विकास कामे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून घेण्यात यावी,अशी अपेक्षाही क्षीरसागर व्यक्त केली.

नाशिकचे केले कौतुक

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना नाशिक विभागाने सक्षमपणे केला असल्याचे सांगून क्षीरसागर यांनी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, महसूल आणि पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभाग यांनी कोरोना लढ्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल आभार व्यक्त केले. ज्या कोरोना रुग्णांना उपचारासाठी वाढीव बिल आकारणी झाली असेल त्या बिलांची पुन्हा लेखा परिक्षण करण्यात येवून त्यांना कोरोना विषयक असलेल्या वैद्यकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

प्रत्येक जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे उद्यान

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात उद्यान स्मारक उभे करून यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी, व्यंगचित्र केंद्र, ओपन जीम, कलादालन, जिल्ह्यातील प्रसिध्द खाद्य पदार्थांचे स्टॉल अशा सर्व समावेशक बाबींचा त्या उद्यान स्मारकात समावेश करण्यात यावा. सदर उद्यान स्मारकाचे विकासकाम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावे, अशा सूचना क्षीरसागर यांनी केल्या.

आयुक्तांनी दिली कामाची माहिती

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी नाशिक विभागात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांची व त्यामाध्यमातून निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन क्षमतेची माहिती दिली.

नाशिकमध्ये 107 कोरोना रुग्णांची वाढ

नाशिकमध्ये बुधवारी 107 कोरोना रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यात नाशिक महापालिका हद्दीतील 38, नाशिक ग्रामीण मधील 65, जिल्हा बाह्य रुग्ण 4 आहेत. त्यात आज दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. त्यातील एक रुग्ण नाशिक महापालिका हद्दीतील, तर एक रुग्ण नाशिक ग्रामीणमधील आहे. आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे 8617 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Instructions for triple supply of oxygen in Nashik; An increase of 107 new corona patients in the district)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये गोदावरीला दुसऱ्यांदा पूर; रामसेतू पुलाजवळ पाणी, नदीकाठची मंदिरे पाण्याखाली

नाशिक-दिल्ली हवाहवाई; लवकरच सुरू होणार विमानसेवा!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.