AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये राजकीय ‘लपवालपवी’, सत्यजित लपवताय की भाजप? नेमकी खेळी काय? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

नाशिकच्या पदवीधर निवडणुकीसाठी (Nashik Padvidhar Election) ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यानंतर, सत्यजित तांबेंनीही (Satyajeet Tambe) प्रचार सुरु केलाय.

नाशिकमध्ये राजकीय 'लपवालपवी', सत्यजित लपवताय की भाजप? नेमकी खेळी काय? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Image Credit source: Google
| Updated on: Jan 18, 2023 | 10:49 PM
Share

नाशिक : नाशिकच्या पदवीधर निवडणुकीसाठी (Nashik Padvidhar Election) ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यानंतर, सत्यजित तांबेंनीही (Satyajeet Tambe) प्रचार सुरु केलाय. विशेष म्हणजे, सत्यजित तांबेंना मविआचेच (MVA) घटक पक्ष असलेल्या कपिल पाटलांनी पाठिंबा दिलाय. पण भाजपचं काय ? सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्यावरुन एवढा सस्पेंस का आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नाशिकच्या पदवीधर निवडणुकीचं मतदान जसं जवळ येतंय, तसतशा घडामोडी वेगानं घडतायत. सत्यजित तांबेंना काँग्रेसनं पाठिंबा देण्यास नकार दिला. पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कपिल पाटलांच्या शिक्षक भारतीनं, सत्यजित तांबेंना पाठींबा दिलाय. सत्यजित तांबेंच्या संवाद मेळाव्यात आमदार कपिल पाटलांनी हजेरी आणि सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला.

काँग्रेस विशेषत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना सुधीर तांबेंचा तीव्र संताप आलाय. सुधीर तांबेंना उमेदवारी देवूनही त्यांनी फॉर्म न भरल्यानं काँग्रेसनं त्यांना निलंबित केलं. तर बंडखोरी केल्यानं सत्यजित तांबेंनाही निलंबित करण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती आहे.

सत्यजित तांबे काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत?

दुसरीकडे सत्यजित तांबेंनीही आपल्या कृतीतून काँग्रेसलाच सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत दिलेत. सत्यजित तांबेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटरवरुन काँग्रेसला लोगो आणि काँग्रेसचा उल्लेख काढलाय. आणि पदवीधर मतदारांसाठी सत्यजित तांबेंनी एक संदेश लिहिलाय.

वारसाने संधी मिळते. पण कर्तृत्व हे सिद्ध करावचं लागतं. महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणारा एक युवक, असा संदेश सत्यजित तांबे यांनी लिहिलाय.

सत्यजित तांबे यांना शिक्षक भारतीचा पाठिंबा

सत्यजित तांबेंसाठी शिक्षक आमदार कपिल पाटलांच्या शिक्षक भारतीचा पाठिंबा महत्वाचा आहे. पण भाजपचा पाठिंबा असणार की नाही ? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. भाजपवरुन मोठा सस्पेंस कायम आहे. कारण उमेदवारी अर्ज भरताच सत्यजित तांबेंनी फडणवीसांकडे पाठिंब्याची मागणी केली होती. मात्र बावनकुळे अजूनही म्हणतायत की सत्यजित तांबेंनी अजून पाठिंबाच मागितला नाही.

नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजित तांबे अशीच थेट लढत आहे. तर काँग्रेसचा शुभांगी पाटलांनाच पाठिंबा जवळपास निश्चितच आहे. उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा सुरु असल्याचं नाना पटोले म्हणालेत.

काँग्रेसमध्ये दोन गट, पटोलेंची डोकेदुखी वाढली

नाशिकमध्ये तांबेंच्या उमेदवारीवरुन झालेल्या घोळामुळं काँग्रेसमध्येच 2 गट पडल्याचं दिसतंय. काँग्रेसचे सचिव राहुल दिवेंनी सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याची मागणी केली. आशिष देशमुखांनी तर सत्यजित तांबेंच्या समर्थनात उतरत नाना पटोले यांच्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मलिल्कार्जुन खर्गेंकडे तक्रार केलीय.

काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाणांचा सूरही सत्यजित तांबेंच्याच बाजूनं आहे. नाशिकमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असं अशोक चव्हाण म्हणतायत

एबी फॉर्म मिळूनही सुधीर तांबेंनी स्वत: अर्ज दाखल न करता, मुलगा सत्यजितचा अपक्ष अर्ज दाखल केला. इथंच काँग्रेसची किरकिरी झाली. त्यातच सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई करुनही, सत्यजित तांबेंसाठी काँग्रेसमध्येच 2 गट झालेत. ही काँग्रेससाठी आणि पटोलेंसाठीही डोकेदुखी आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.