Nashik : पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहांची हेळसांड

शवविच्छेदनासाठी मृतदेहाच्या नातेवाईकांना पिंपळगाव बसवंत येथून निफाड येथे 20 ते 25 किलोमीटर लांब पाठविले जात असल्याने नातेवाईकांची यामुळे धावपळ होते. तसेच मृतदेहाचीही हेळसांड होत असल्याने या गंभीर प्रकारांची जिल्हा परिषद व आरोग्य विभागाने दखल घेत तातडीने या ठिकाणी शवविच्छेदन सहाय्यकाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Nashik : पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहांची हेळसांड
पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहांची हेळसांड
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 7:59 PM

नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा (Health Center)त गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शवविच्छेदन (Post Mortam) सहाय्यक नसल्याने मृतदेहाची हेळसांड होत आहे. मृताच्या नातेवाईकांना मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड येथे घेऊन जावे लागत असल्याने त्यांची धावपळ होते. अपघातातील मृतदेह पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात येते. या ठिकाणी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शवविच्छेदन सहाय्यक आजारपणामुळे उपलब्ध नसल्यामुळे शवविच्छेदन कक्ष बंद आहे. या शवविच्छेदन कक्षाची दुरवस्था झाली आहे तसेच तासन तास मृतदेह नातेवाईकांना शववाहिकेत घेऊन उभे राहण्याची वेळ येत आहे. (Lack of facilities at Primary Health Center at Pimpalgaon Baswant in Nashik)

मृतदेहांची हेळसांड होतेय

शवविच्छेदनासाठी मृतदेहाच्या नातेवाईकांना पिंपळगाव बसवंत येथून निफाड येथे 20 ते 25 किलोमीटर लांब पाठविले जात असल्याने नातेवाईकांची यामुळे धावपळ होते. तसेच मृतदेहाचीही हेळसांड होत असल्याने या गंभीर प्रकारांची जिल्हा परिषद व आरोग्य विभागाने दखल घेत तातडीने या ठिकाणी शवविच्छेदन सहाय्यकाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे. अन्यथा मृतदेहाच्या नातेवाईकांसह नागरीक तीव्र आंदोलन करतील असा इशारा यावेळी आरोग्य विभागाला देण्यात आला आहे.

द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथून मुंबई-आग्रा तसेच सुरत-शिर्डी असे दोन महामार्ग जात असल्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ या दोन्ही महामार्गांवर असते. वाहनांचा वेगही जास्त प्रमाणात असल्याने लहान-मोठ्या दुर्घटना नेहमीच घडतात. यात अनेकांना मोठ्या दुखापतीला तर काहींना आपले प्राण या अपघातात गमावण्याची वेळ येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील कैद्यांना मिळतेय मोफत विधी सेवा

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विधी सेवा प्राधिकरणातर्फे नाशिक जिल्ह्यातील न्यायाधीन व शिक्षा बंदी अशा सर्व व्यक्तींना मोफत विधी सेवा व सहाय्य देण्यात येत आहे. जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या किंवा तपासावर असलेल्या फौजदारी प्रकरणांमध्ये विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 चे कलम 12 नुसार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक व जिल्हयामध्ये अस्तित्वात असलेल्या उप कारागृहामध्ये दाखल असलेल्या न्यायाधीन बंदी (ज्या बंदीचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत), शिक्षाबंदी (ज्या आरोपींना शिक्षा झालेली आहे) व ज्या आरोपींचे प्रकरणे तपासावर आहेत अशा सर्व व्यक्तींना कायद्याबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे याकरिता हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. (Lack of facilities at Primary Health Center at Pimpalgaon Baswant in Nashik)

इतर बातम्या

येवल्यात माजी नगराध्यक्षासह भाजपच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; छगन भुजबळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

भुजबळांनी सांगितला नाशिकच्या विकासाचा प्लॅन, म्हणाले आरोग्य जपत…

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.