लासलगावचे कांदा लिलाव ठप्प, बाजार समिती प्रशासनाच्या भूमिकेवर शेतकरी संतप्त

विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्था ही कांदा व्यापारी असोसिएशनची सभासद नसल्याने कांदा लिलावातून काढता पाय घेतल्याने कांदा व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे कांद्याचे लिलाव ठप्प झाले. Lasalgaon onion auction

लासलगावचे कांदा लिलाव ठप्प, बाजार समिती प्रशासनाच्या भूमिकेवर शेतकरी संतप्त
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 7:08 PM

उमेश पारीक, टीव्ही 9 मराठी, लासलगाव

नाशिकः आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजार समिती म्हणून नावलौकिक असलेल्या लासलगाव बाजार समितीत महिला सभापती आणि उपसभापती असताना महिला संस्थेची कांदा खरेदीसाठी गळचेपी पाहायला मिळतेय. विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्था ही कांदा व्यापारी असोसिएशनची सभासद नसल्याने कांदा लिलावातून काढता पाय घेतल्याने कांदा व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे कांद्याचे लिलाव ठप्प झाले, दुपारपर्यंत कुठलाही तोडगा न निघाल्याने लासलगाव बाजार समिती प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे शेतकरी संतप्त झालाय. (Lasalgaon onion auction stalled, farmers angry over market committee administration’s role)

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे होताना दिसतायत

लासलगाव बाजार समितीत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे होताना पाहायला मिळते. आज विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्था ही नाफेडसाठी कांदा खरेदीला उतरली असता, ही संस्था लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनचे सभासद नसल्याने कांदा व्यापाऱ्यांनी लिलावातून सहभाग काढून घेतल्याने कांद्याचे लिलाव ठप्प झाले. कांदा लिलाव बंद पडल्याने शेतकरी आक्रमक होत लिलाव पूर्ववत सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली.

केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेंतर्गत मे महिन्यात कांदा खरेदी सुरू केली

लासलगाव बाजारपेठेत गेल्या वर्षी केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेंतर्गत मे महिन्यात कांदा खरेदी सुरू केली होती. ऑगस्टपर्यंत 31 हजार 694 क्विंटल कांद्याची खरेदी कमाल 1187 रुपये, किमान 532 रुपये तर सर्वसाधारण 950 रुपयाने खरेदी केली होती. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने नाफेडमार्फत केंद्र सरकारची कांदा खरेदी तब्बल एक महिना लेट सुरू झाली. आज लासलगाव बाजार समितीतून नाफेडसाठी दोन वाहनांतून कांद्याची खरेदी करण्यात आली, कमाल 2057 तर किमान 1850 इतका बाजार भाव मिळाला आहे.

कांदा व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतल्याने बाजार समितीतील लिलाव ठप्प

लासलगाव बाजार समितीचे परवानाधारक असलेल्या विंचूर येथील कृषी साधना शेतकरी संस्थेच्या वतीने नाफेडसाठी महिलेने खरेदी सुरू करताच पुरुष प्रधान असलेल्या कांदा व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतल्याने बाजार समितीतील लिलाव ठप्प झाले. लवकरच यात तोडगा काढून लिलाव पूर्ववत सुरू करणार असल्याचे बाजार समितीचे सचिव यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

दर महिन्याच्या अमावस्येला लासलगाव बाजार समिती असते बंद, कारण….!

सरकारने 39.55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले 75 हजार कोटी, नेमकं कारण काय?

Lasalgaon onion auction stalled, farmers angry over market committee administration’s role

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.