सरकारने 39.55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले 75 हजार कोटी, नेमकं कारण काय?

शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील गहू खरेदी सुरु करण्याचं काम सुरु आहे. wheat procurement

सरकारने 39.55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले 75 हजार कोटी, नेमकं कारण काय?
Wheat
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 2:14 PM

नवी दिल्ली: देशातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील गहू खरेदी सुरु करण्याचं काम सुरु आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांकडून 2020-21 च्या खरिप आणि 201-22 च्या रब्बी हंगामात किमान आधारभूत किमतीला गव्हाची खरेदी चालू आहे. याअंतर्गत 20 मे 2021 पर्यंत 75 हजार 514.61 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. तर, किमान आधारभूत किमतीला 382.35 लाख मेट्रिक टन गहू शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे. तर, 39 लाख 55 हजार शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी करण्यात आलीय. (Central and State Governments purchase wheat procurement of 75 thousand crore rupees)

धानाची खरेदी सुरु

धान उत्पादक शेतकऱ्यांकडून 20 मेपर्यंत 760.06 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये खरिप हंगामातील 705.52 लाख मेट्रीक टन तर रब्बी हंगामातील 54.45 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आलीय. किमान आधारभूत किमतीवर धान खरेदी सुरु आहे. तर, गेल्यावर्षी 703.09 लाख मेट्रीक टन धान खरेदी करण्यात आली होती. 113.30 लाख शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमंतीवर 1 लाख 43 हजार 500 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

डाळीची रेकॉर्ड ब्रेक खरेदी

सन 2020-21 च्या खरिप हंगामात उत्पादित झालेल्या डाळींची देखील विक्रमी खरेदी सरकारी खरेदी केंद्राद्वारे करण्यात आलीय. मूग, उडीद, तूर, चना, मसूर, भुईमूग,सोयाबीन इत्यादी डाळींची 6 लाख 76 हजार 103 मेट्रीक टन खरेदी करण्यात आली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, हरियाणा आणि राजस्थान मधील 4 लाख 04 हजार 2224 शेतकऱ्यांकडून 3 हजार 541.67 कोटींची खरेदी करण्यात आली आहे.

कापूस खरेदी देखील सुरु

किमान आधारभूत किमंत योजनेद्वारे पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक राज्यामध्ये कापूस खरेदी सुरु आहे. याशिवाय 14 मे पर्यंत केंद्र सरकारने कर्नाटक मधील शेतकऱ्यांकडून 5089 मेट्रीक टन नारळ खरेदी केले आहेत, यासाठी 52.40 कोटी रुपये देण्यात आले.

संबंधित बातम्या:

साखरेचं विक्रमी उत्पादन, कारखान्यांसमोर आता विक्रीचं आव्हान, सरकारची भूमिका काय?

कापूस शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी, यावर्षी मिळेल बंपर कमाई, निर्यातीतही होईल 20% वाढ

(Central and State Governments purchase wheat procurement of 75 thousand crore rupees)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.