इगतपुरी रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्री बंद, कारवाईविरोधात विक्रेत्यांकडून पोलिसांचा निषेध

गेल्या 10 दिवसांत लोहमार्ग पोलिसांनी नाशिकमधील इगतपुरी रेल्वे स्थानकावर 35 वेंडरवर बेकायदेशीर दंडात्मक कार्यवाही केली. ही कारवाई अयोग्य असून पोलिस आम्हाला नाहक त्रास देत असल्याचा आरोप खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केला आहे.

इगतपुरी रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्री बंद, कारवाईविरोधात विक्रेत्यांकडून पोलिसांचा निषेध
इगतपुरी रेल्वे स्थानक
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 11:04 AM

नाशिक : लोहमार्ग पोलीस, इगतपुरी आणि इगतपुरी रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या मध्य रेल्वेच्या अधिकृत वेंडर (खाद्य विक्रेते) यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. लोहमार्ग पोलिसांच्या विनाकारण कारवाईच्या निषेधार्थ रेल्वे स्थानकातील सुमारे 200 वेंडर यांनी आज इगतपुरी रेल्वे स्थानकातील सर्व खाद्य पदार्थ विक्री बंद करुन लोहमार्ग पोलिसांचा निषेध केला आहे. यामुळे स्थानकात आलेल्या एकाही प्रवाशाला खाद्य पदार्थ मिळालेल नाहीत. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

गेल्या 10 दिवसांत लोहमार्ग पोलिसांनी नाशिकमधील इगतपुरी रेल्वे स्थानकावर 35 वेंडरवर बेकायदेशीर दंडात्मक कार्यवाही केली. ही कारवाई अयोग्य असून पोलिस आम्हाला नाहक त्रास देत असल्याचा आरोप खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केला आहे. दरम्यान, सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्थानकावरील सर्व मुख्य पाच कँटीन बंद ठेवण्यात आले. कँटीन मालक आणि वेंडर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली.

दरम्यान, इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक सोपान भाईक यांनी केलेल्या कार्यवाहीचे समर्थन केले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कार्यवाही योग्य असून कायद्याच्या तरतुदीनुसार केली असल्याचे सांगितले आहे.

मुंबईत भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

दुसरीकडे, राज्यातील अन्न आणि औषध विभाग (FDA) मार्फत मुंबईत अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि भेसळयुक्त दर्जाचे खाद्य तेल जप्त करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने खाद्य तेल खरेदी करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील नागरिकांना उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ मिळावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) वारंवार विविध दुकानांवर छापेमारी करतात. एफडीतर्फे छापेमारीचे सत्र सुरु केले आहेत. यावेळी अन्न शिजवण्यासाठी गृहिणी जे तेल वापरतात, त्यातील सुमारे 50 टक्के तेल वापरण्यास योग्य नसून ते भेसळयुक्त होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली होती

झोपडपट्टीत मोठी मागणी

एफडीएने स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या सुट्या तेलाचे नमुने गोळा करून त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली होती. मात्र यात रंग मिसळलेलं किंवा दुसरे तेल मिक्स अल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे अनेक नामवंत कंपन्यांच्या तुलनेत हे तेल खूपच स्वस्त असल्यामुळे या भेसळयुक्त तेलाला झोपडपट्टी विभागात मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मात्र हे तेल आरोग्याला अपायकारक असते.या खाद्यतेलात रंग मिसळलेला असतो.

एफडीए प्रशासनाने 30 अन्ननिरीक्षकांची विविध पथके स्थापन करून या उत्पादकांवर कारवाई केली आहे. या धाड सत्रात आठ उत्पादकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत चार कोटी 98 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. यात शेंगदाणा, मोहरी, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल, पामोलिन इत्यादी तेलांचे सुमारे 93 नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. यापैकी 49 नमुने भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट झाले.

संबंधित बातम्या :

सावधान! मुंबईत निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.