सापुतारा घाटात दरड कोसळली, नाशिक-सुरत महामार्ग वाहतुकीसाठी बंद
Nashik Rain : नाशिक-सुरत महामार्गावर सापुतारा घाटात दरड कोसळली आहे.

नाशिक : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस (Nashik Rain) सध्या सुरू आहे. त्यामुळे सगळीकडेच दाणादाण उडाली आहे. या पावसाचा नाशिक-सुरत महामार्ग परिणाम झाला आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरच्या सापुतारा घाटात (Sapura Ghat) दरड कोसळली आहे. त्यामुळे नाशिक -सुरत महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सुरतवरून येणारी वाहणं सुरगाणामार्गे वळवण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली असून, गंगापूर धरणातून जवळपास दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मानेपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. गोदावरी नदीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे.
नाशिक-सुरत महामार्ग वाहतुकीसाठी बंद
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. त्यामुळे सगळीकडेच दाणादाण उडाली आहे. या पावसाचा नाशिक-सुरत महामार्ग परिणाम झाला आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरच्या सापुतारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे नाशिक -सुरत महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सुरतवरून येणारी वाहणं सुरगाणामार्गे वळवण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय.
इगतपुरी तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. संपूर्ण तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. इगतपुरी, घोटी शहरासह ग्रामीण भाग आणि एकूणच संपूर्ण तालुक्याचे जनजीवन यामुळे प्रभावित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आज (दि. 12) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आज शक्यतो घराबाहेर पडू नये, पालक वर्गानेही विद्यार्थी घरातच सुरक्षित राहतील याची खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
