नऊवारी साडीला आले वाईट दिवस, बाजारातील परिस्थिती काय?; कारखानदार म्हणतात,…

मालेगावच्या रंगीत साडीची देशात आगळी वेगळी ओळख आहे. अनेक व्यावसायिक आणि कारागीर मालेगावात रंगीत साडी तयार करतात. देशातील अनेक ठिकाणांहून मालेगावच्या साडीची मागणी असते.

नऊवारी साडीला आले वाईट दिवस, बाजारातील परिस्थिती काय?; कारखानदार म्हणतात,...
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 2:50 PM

मालेगाव : नऊवारी साडी महाराष्ट्राची शान आहे. आधी मोठ्या प्रमाणात महिला नऊवारी साड्या घालत होत्या. आता नऊवारी साड्या वापरण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे या साडीची मागणी घटली. या साडीला वाईट दिवस आले आहेत. त्यामुळे साडी व्यापारी, व्यावसायिक अडचणीत आले आहेत. बाजारात नऊवारी साडीचा स्टॉक शिल्लक आहे. त्यामुळे उत्पादन थांबवावे लागले. कागारिकांना आठवड्यातून तीनच दिवस काम मिळत आहे. याचा आर्थिक फटका कारागिरांच्या कुटुंबावर पडत आहे.

व्यावसायिकांना फटका

मालेगावच्या रंगीत साडीची देशात आगळी वेगळी ओळख आहे. अनेक व्यावसायिक आणि कारागीर मालेगावात रंगीत साडी तयार करतात. देशातील अनेक ठिकाणांहून मालेगावच्या साडीची मागणी असते. मार्केटमध्ये आलेल्या मंदी आणि महागाईचा फटका मालेगावच्या व्यावसायिकांवर बसला. लाखो रंगीत नऊवारी साड्या सध्या मालेगावात पडून आहेत. मागणी कमी झाल्याने व्यावसायिकांनी देखील उत्पादन कमी केलं. त्याचा थेट परिणाम कारागिरांच्या आयुष्यावर होत आहे.

sadi 2 n

हे सुद्धा वाचा

कारागिरांनी तीनच दिवस काम

वर्षानवर्षे साड्या बनवणाऱ्या कारागिरांना मंदीचा फटका बसला. त्यांचे कुटुंबदेखील अडचणीत सापडले आहे. साडीचा स्टॉक शिल्लक राहत आहे. कारखानदार यांनी उत्पादन कमी केले. आठवड्यात केवळ तीन दिवस या कामगारांना काम मिळत आहे.

नऊवारी साडी ठरत आहे कालबाह्य

मालेगावची रंगीत साडी म्हणजे मराठमोळ्या गृहिणींची आगळी-वेगळी ओळख आहे. मार्केटमध्ये आलेली मंदी आणि महागाई या कारणांमुळे महाराष्ट्राची अस्मिता जोपासणारी ही नऊवार साडी सद्या कालबाह्य ठरू पाहत आहे. एकेकाळी मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणारी रंगीत साडीची अलीकडच्या काळात मागणी कमी झाली.

लाखो रंगीत साड्या सध्या नाशिकच्या मालेगावात स्टॉकमध्ये पडून आहेत. बाहेरील राज्यातीलही मागणी घटल्याने त्याचा फटका व्यावसायिक व कारागिरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. कारागिरांच्या कुटुंबीयांवर फार मोठं संकट कोसळलं आहे. साडीचे व्यापारीही नाराज आहेत. त्यांच्याकडे असलेला स्टॉक केव्हा संपणार? तेव्हाच ते नवीन साड्या तयार करू शकतील.  तोपर्यंत व्यवसाय ठप्प पडला आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.