Malegaon murder : मालेगावात तरुणाचा खून, कॅम्प पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल!

दरम्यान नाशिक येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. विजयचा मृत्यू झाल्याने कुटूंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस तपास करीत आहेत. विजयच्या जाण्याने बागुल कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Malegaon murder : मालेगावात तरुणाचा खून, कॅम्प पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 11:44 AM

मालेगाव : मालेगाव (Malegaon) शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एका तरुणाचा खून करण्यात आलायं. अज्ञात तरुणांनी मारहाण करत विजय बागुल याला गंभीर जखमी केले. त्यानंतर विजयला नाशिक येथील हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाला. आता याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावच्या या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण आहे. विजय बागुलला कोणी मारहाण केली आणि नेमके काय कारण होते, याचा शोध आता पोलिस (Police) घेत आहेत.

तरूणांनी मारहाण केल्याने विजय गंभीर जखमी

विजय बागुल याला काही तरुणांनी लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला हाॅस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तत्काळ नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू विजय गंभीर जखमी असल्याने त्याला वाचवण्यात यश मिळाले नाही.

प्रकृती खालावल्याने विजयचा मृत्यू