ऑडिओ क्लीप व्हायरल करून नाशिकमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जबाजारीपणामुळे टोकाचे पाऊल

शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज होत आहेत. आतापर्यंत देशात जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. असे असताना, राज्य असो वा केंद्र सरकार त्याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही. शेतकरी आत्महत्यांना राष्ट्रीय आपत्ती मानले पाहिजे व एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

ऑडिओ क्लीप व्हायरल करून नाशिकमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जबाजारीपणामुळे टोकाचे पाऊल
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 11:53 AM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात पुन्हा एका तरुण शेतकऱ्याने (farmer) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या (suicide) केल्याचे समोर आले आहे. संदीप भुसाळ असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. भुसाळ हे दिंडोरी तालुक्यातल्या निळवंडी पाडे गावचे रहिवासी आहेत. त्यांच्यावर साधरणतः सात ते आठ लाख रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते. आत्महत्या करण्यापूर्वी भुसाळ यांनी एक ऑडिओ क्लीप तयार करून व्हायरल केली. त्यात मी कर्जामुळे आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा संदेश आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या आहेत. विदर्भ, मराठवाडासह उत्तर महाराष्ट्रातही आता असे टोकाचे पाऊल उचलण्याचे लोण पोहचले आहे. यापूर्वी अनेक भागांना दुष्काळाचा फटका बसला. त्यानंतर आता पाऊस सुरू आहे. मात्र, कधी अतिवृष्टी, तर कधी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस मोठा होतो आणि याच्याच दडपणाखाली शेतकरी स्वतःला संपवत आहेत.

आतापर्यंत 5 लाख शेतकरी आत्महत्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज होत आहेत. आतापर्यंत देशात जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. असे असताना, राज्य असो वा केंद्र सरकार त्याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही. शेतकरी आत्महत्यांना राष्ट्रीय आपत्ती मानले पाहिजे व एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. शेतकरी आत्महत्या हा पुढे ढकलण्यासारखा विषय नाही. इतर सगळी कामे बाजूला ठेवून ‘शेतकरी आत्महत्या’ हा विषय सरकारने अग्रक्रमाने विचारात घेतला पाहिजे, अशी मागणी किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख आणि शेतकरी नेते अमर हबीब यांनी केली आहे.

शेतकरी आत्महत्यांचे मूळ कुठे?

कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग), आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण आदी नरभक्षी कायदे शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहेत. ते तत्काळ रद्द झाले पाहिजेत. हे कायदे पक्षपात करणारे आहेत. मुलभूत अधिकारात हस्तक्षेप करणारे आहेत. घटनाविरोधी आहेत. शेतकरीविरोधी कायदे टिकून राहावे म्हणून आपल्या मूळ घटनेत नसलेले, पण पहिली घटना दुरुस्ती करून टाकलेले 9 वे परिशिष्ट आहे. या परिशिष्टात टाकलेल्या कायद्यांच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही. म्हणून हे कायदे टिकून राहिले आहेत. परिशिष्ट 9 मध्ये आज 284 कायदे आहेत त्यापैकी 250 कायदे थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण हे कायदे या परिशिष्टात असल्यामुळे ते टिकून राहिले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न गरिबीचा नसून गुलामीचा आहे. म्हणून शेतकऱ्यांना या कायद्यातून सोडवणे महत्वाचे आहे, अशी मागणी किसानपुत्र आंदोलनने केली आहे.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.