Nashik : शहराला 31 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन

Nashik : शहराला 31 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक,  पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन
शहराला 31 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक
Image Credit source: tv9 marathi

नाशिकच्या रहिवाशांना प्रामुख्याने गंगापूर धरण समूह, मुकणे धरण आणि काही प्रमाणात दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी 15 ऑक्टोबर ते 31 जुलै या कालावधीत पावसाळा वगळता नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचे पाणी या धरणांमधून दिले जाते.

चंदन पुजाधिकारी

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 13, 2022 | 10:44 PM

नाशिक – गेल्या वर्षी नाशिकमध्ये (Nashik) जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण (Gangapur Dam), मुकणे धरण आणि दारणा धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. नाशिक महापालिकेसाठी आरक्षित पाण्यापैकी गरजे एवढं पाणी शिल्लक आहे. शहराला (Nashik City) पुरवठा करणाऱ्या धरणात 31 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. धरणातील कमी पाणी झाल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्याचे अवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या सहा विभागात विशेष पथक तयार करण्यात आली आहेत. पाणी चोरी फोटोसहीत तक्रार केल्यास संबंधित व्यक्तीवरती कारवाई करण्यात येणार आहे.

प्रमुख धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो

नाशिकच्या रहिवाशांना प्रामुख्याने गंगापूर धरण समूह, मुकणे धरण आणि काही प्रमाणात दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी 15 ऑक्टोबर ते 31 जुलै या कालावधीत पावसाळा वगळता नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचे पाणी या धरणांमधून दिले जाते. गतवर्षी नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेने गंगापूर धरण समूहातून 4 हजार दशलक्ष घनफूट, मुकणे धरणातून 1500 दशलक्ष घनफूट आणि दारणा धरणातून 100 दशलक्ष घनफूट पाणी पाटबंधारे विभागाकडे राखून ठेवण्याची मागणी केली होती.

31 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

सध्या राज्यात उष्णतेची लाट असून असून तापमान अधिक वाढलं आहे. पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन नाशिक महापालिकेकडून करण्यात आले आहे. 31 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें