लसीचे दोन्ही डोस घेऊनही नाशिकचे जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Nashik Collector Suraj Mandhare) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही डोस घेतले होते.

लसीचे दोन्ही डोस घेऊनही नाशिकचे जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
सुरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

नाशिक : नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Nashik Collector Suraj Mandhare) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही डोस घेतले होते. तरीही त्यांना लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Nashik Collector Suraj Mandhare tested for coronavirus even after two dose of covid19 vaccine)

जिल्हाधिकारी सुरज मांढरे हे कालच राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबत बैठकीला उपस्थित होते. नाशिकमध्ये झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सुरज मांढरे यांना काही लक्षणे जाणवल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सुरज मांढरे यांनी कोरोनाची दोन्ही डोस घेतले होते. शिवाय ते कोरोना नियमावलीचं पालन करतात. तरीही त्यांना कोरोनाने गाठलं.

दरम्यान, कोरोनाचे दोन्ही डोस घेतले तरी कोरोना होऊ शकतो, हे यापूर्वीच तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे यामध्ये आश्चर्याची काही बाब नाही. मात्र प्रतिबंधात्मक लसीमुळे धोक्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे पात्र नागरिकांनी शक्य तितक्या लवकर लस घेण्याचं आवाहन, सरकारमार्फत केलं जात आहे.

दोन महिन्यात 70 टक्के लसीकरण करणार

दरम्यान, दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक दौरा केला होता. यावेळी त्यांनी दोन महिन्यात 70 टक्के लसीकरण करणार असल्याची माहिती दिली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 60 वर्षांवरील लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत 30 ते 60 वयोगटातील लोकांना कोरोनाची बाधा झाली होती, असं ते म्हणाले. येत्या दोन महिन्यात 70 टक्के लसीकरण करण्याचं ठाकरे सरकारचं टार्गेट आहे. मात्र, एवढ्या लस नाहीत. तरीही आम्ही हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. कोरोना कामात निधीची कमतरता भासू नयेत असा आमचा प्रयत्न आहे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर खबरदारी घेत नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय. मात्र नागरिकांनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाहीय. त्यामुळे शहरातील निर्बंधांची कठोर अमंलबजावणी प्रशासनाने सुरू केली आहे. संचारबंदी उल्लंघन करणाऱ्या 10 जणांवर तर बाजारात विनामास्क फिरणाऱ्या 167 नागरिकांकडून 83 हजारांचा दंड वसूल केला आहे. तर वेळेचं उल्लंघन करणाऱ्या 4 दुकानांकडून 20 हजार दंड वसूल केला आहे.पोलिसांकडून आता अधिक कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

तिसरी लाट तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक; टास्क फोर्सच्या हवाल्याने अजित पवारांचा इशारा

कोरोना लसीविषयी आदिवासींमध्ये गैरसमज आणि भिती, ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी : छगन भुजबळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI