Nashik Crime | खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून नाशिकमध्ये एकाची आत्महत्या; तिघांविरोधात गुन्हा

बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना व अवैध सावकारी केल्यास संबंधितांस 5 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंत दंड यापैकी एक किंवा दोनही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, या कायद्याच्या कचाट्यातून अनेक सावकार सुटतात. त्यामुळे असे बळी जात आहेत.

Nashik Crime | खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून नाशिकमध्ये एकाची आत्महत्या; तिघांविरोधात गुन्हा
सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 1:04 PM

नाशिकः खासगी सावकाराच्या (Moneylender) छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची अजून एक घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. दिलीप दयाराम रौंदळ (रा. बंगल नंबर 42, तलाठी कॉलनी, दिंडोरीरोड, म्हसरूळ, नाशिक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रौंदळ यांची मुलगी प्रणाली दिलीप रौंदळ यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलीस (Police) ठाण्यात अरुण बोधले, विजय लहामगे, चंदेश लोढया (सर्व रा. नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप रौंदळ यांनी संशयितांकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशासाठी संशयितांनी तगादा लावला होता. त्यांनी रौंदळ यांचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्यामुळे त्यांनी कंटाळून मिर्ची हॉटेल चौकाजवळ खुशाल ट्रान्सपोर्ट, औरंगाबाद रोडे येथे विष प्राशन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अजून एकाही संशयिताला पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे मृतांचे नातेवाईकांमध्ये असंतोष आहे.

दुसरी घटना उघडकीस

नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून नीलेश बाळासाहेब सोनवणे या 30 वर्षीय तरुणानेही आत्महत्या केली होती. सातपूर अशोकनगर भागातील नीलेश सोनवणेला आर्थिक चणचण होती. त्यामुळे खासगी सावकार निखिल भावले याच्याकडून 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी भावलेने गेल्या कित्येक दिवसांपासून नीलेशमागे तगादा लावला होता. तो त्याच्याकडे सतत पैशाची मागणी करायचा. अपशब्द उच्चारायचा. यामुळे नीलेश टेन्शनमध्ये होता. मात्र, सावकार भावले याने नीलेशची दुचाकी ओढून नेली. त्यामुळे नीलेश नैराश्याच्या गर्तेत गेला. त्यामुळे त्याने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी संशयित भावलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

कायदा काय सांगतो?

बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना व अवैध सावकारी केल्यास संबंधितांस 5 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंत दंड यापैकी एक किंवा दोनही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच परवाना प्राप्त करुन घेताना हेतूपुरस्पर व जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती अर्जासोबत सादर केल्यास 2 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 25 हजार पर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

का होत नाही अंमलबजावणी?

खोट्या नावाने परवाना घेणे, नमूद पत्त्याव्यतिरीक्त किंवा कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवसाय करणे, दुसऱ्याच्या नावावर सावकारी करणे या बाबी आढळल्यास पहिल्यांदा गुन्हा केल्यास 1 वर्षापर्यंत कैद किंवा 15 हजार रुपये दंडाची शिक्षा, हाच गुन्हा दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर केल्यास 5 वर्षापर्यंत कैद किंवा 50 हजारापर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, या कायद्याच्या कचाट्यातून अनेक सावकार सुटतात. त्यामुळे असे बळी जात आहेत.

इतर बातम्याः

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.