नाशिक मार्केट परिसरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला भीषण आग, लाखोंचा मुद्देमाल जळून खाक

नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एमजी रोड परिसरात असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाला आग लागली. या आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

नाशिक मार्केट परिसरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला भीषण आग, लाखोंचा मुद्देमाल जळून खाक
Nashik Fire

नाशिक : नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एमजी रोड परिसरात असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाला आग लागली. या आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे धुराचे प्रचंड लोट उठले होते. यावेळी या दुकानासह गोडाऊनमधील लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. नाशिकमधील जाधव मार्केट परिसरात व्यापारी संकुल आहे. हे दुकान व्यापारी संकुलाजवळ असल्याने भीतीचे वातावरण पसरलं होतं. (Nashik market area Electronics shop fire Massive damage to the shop)

लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक

नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एमजीरोड परिसरात असलेल्या राहुल ट्रेडर्स या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाला संध्याकाळच्या सुमारास अचानक आग लागली. काही मिनिटातच या आगीने रौद्ररुप धारण केले. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले. मात्र तोपर्यंत या आगीत दुकानासह गोडाऊनमधील लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. यात टीव्ही, फ्रिज, लॅपटॉप, कॉम्प्युटर, वॉशिंग मशीन यासारख्या असंख्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हे गोडाऊन बेसमेंटला होते. तसेच या ठिकाणी सतत पावसाच्या संततधारेमुळे आग विझवताना अडचणी निर्माण होत होत्या. तसेच या आगीमुळे या ठिकाणी धुराचे प्रचंड लोट उठले होते. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर ही आग विझवण्यात यश आलं आहे. मात्र ही आग नेमकी का लागली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

इतर बातम्या

पेट्रोल भरतानाच नाही तर आता गाडीवर विना हेल्मेट दिसला तरी कारवाई होणार, नाशिक पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये

शिवीगाळ आणि मारहाण, नाशिकमधील टोलनाक्यावर दादागिरी करणाऱ्या तृतीयपंथींवर गुन्हा

आठ लाखांचे लाच प्रकरण, शिक्षणाधिकारी वैशाली झनकरांची कारागृहात रवानगी

(Nashik market area Electronics shop fire Massive damage to the shop)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI