AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील अग्रगण्य कादवा साखर कारखान्यावर विकास पॅनलची विजयी गुढी; नाशिककरांनी परिवर्तन नाकारले

महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्याची ओळख आहे. कर्मवीर कै. राजाराम सखाराम वाघ यांनी या कारखान्याची सुरुवात केलीय. या कारखान्यासाठी दिंडोरी, निफाड, नाशिक, कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ऊस उपलब्ध होतो.

राज्यातील अग्रगण्य कादवा साखर कारखान्यावर विकास पॅनलची विजयी गुढी; नाशिककरांनी परिवर्तन नाकारले
कादवा कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर श्रीराम शेटे यांची मिरवणूक काढण्यात आली.
| Updated on: Apr 05, 2022 | 1:45 PM
Share

नाशिकः राज्यात बहुचर्चित असणारा आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यात सहकारी तत्वावर सुरू असणाऱ्या एकमेव अशा कादवा सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) निवडणुकीत (Election) सत्ताधारी श्रीराम शेटे यांच्या कादवा विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. या पॅनलेच्या सर्वच्या सर्व म्हणजे एकूण 17 जागावर उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे परिवर्तन पॅनलला जोरदार धक्का बसला आहे. कादवाच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्रीराम शेटे यांचे कादवा विकास पॅनल आणि अॅड. बाजीराव कावळे आणि सुरेश डोखळे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. एकूण 92 टक्के मतदान झाले. उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव मिळवून दिला. त्यामुळेच हा विजय झाल्याची प्रतिक्रिया कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली आहे. येणाऱ्या काळात कादवाची गाळप क्षमता चार हजारपर्यंत वाढवणे, सीएनजी प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडणूक झाली चुरशीची

कादवा सहकारी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यासाठी रविवारी तीन एप्रिल रोजी मतदान झाले होते. यावेळी 12110 पैकी 11243 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी मतदानाची 92.84 टक्के नोंद झाली. कारखान्याच्या 17 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात होते. कादवा कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे यांना बिगर ऊस उत्पादनकांनी निवडून दिले असून, हा धनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया परिवर्तन पॅनलचे सुरेश डोखळे यांनी दिली आहे.

1978 साली सुरुवात

महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्याची ओळख आहे. कर्मवीर कै. राजाराम सखाराम वाघ यांनी या कारखान्याची सुरुवात केलीय. या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम 1978 साली सुरू झाला. या कारखान्यासाठी कच्चा माल म्हणजेच ऊस दिंडोरी, निफाड, नाशिक, कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उपलब्ध होतो. सध्या कारखान्याची गाळप क्षमता ही 1250 टनावरून 2500 क्षमतेपर्यंत आहे. आगामी काळात ती 4000 टनापर्यंत नेऊ असा विश्वास विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे यांनी व्यक्त केलाय.

उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव मिळवून दिला. त्यामुळेच हा विजय झाला आहे. येणाऱ्या काळात कादवाची गाळप क्षमता चार हजारपर्यंत वाढवणे, सीएनजी प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे.

– श्रीराम शेटे, अध्यक्ष, कादवा सहकारी साखर कारखाना

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.