AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळाचा चेहरा पाहायला निघालेल्या पित्यावर काळाचा घाला, खड्ड्यात बाईक अडकून नाशकात तरुणाचा मृत्यू

इगतपुरी (Igatpuri) शहरातील खड्ड्याने एका बापाला आपल्या नवजात बाळाचा चेहरा पाहण्यापूर्वीच त्याच्यापासून हिरावून घेतलं आहे. इगतपुरीत खड्ड्यामुळे (Potholes) झालेल्या अपघातात (Accident) एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुर्दैव म्हणजे ही व्यक्ती आपल्या नवजात बाळाला पाहायसाठी जात असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बाळाचा चेहरा पाहायला निघालेल्या पित्यावर काळाचा घाला, खड्ड्यात बाईक अडकून नाशकात तरुणाचा मृत्यू
Igatpuri Accident
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 8:15 AM
Share

इगतपुरी : इगतपुरी (Igatpuri) शहरातील खड्ड्याने एका बापाला आपल्या नवजात बाळाचा चेहरा पाहण्यापूर्वीच त्याच्यापासून हिरावून घेतलं आहे. इगतपुरीत खड्ड्यामुळे (Potholes) झालेल्या अपघातात (Accident) एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुर्दैव म्हणजे ही व्यक्ती आपल्या नवजात बाळाला पाहायसाठी जात असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बाळाला पाहायसाठी जात असताना काळाचा घाला

बायकोची प्रसुती झाली, घरी गोड बातमी आली. म्हणून एक व्यक्ती आपल्या नवजात मुलाला पाहण्याकरता जात होता. मात्र, त्याच्यावर खड्डेरुपी काळ घात लावून बसला होता. गाडीवरुन जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात गाडीचे चाक अडकून त्या व्यक्तीचे नियंत्रण सुटले आणि तो खाली पडला. या दुर्घटनेट त्याच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्देवी घटनेनंतर स्थानिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांरी दुर्लक्ष केल्यामुळे या व्यक्तीचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरीकर या खड्ड्यांविरोधात आंदोलन करत आहेत.

जळगावात क्रुझरचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कामगारांच्या वाहनाला चाळीसगाव नजीक अपघात झाल्याची घटना घडलीये. त्यात 4 जणांचा मृत्यू झालाय. तर, अन्य 13 जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे येथील शासकीय रुग्णलयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. हे सर्व कामगार क्रुझर या वाहनातून प्रवास करत होते.

तिघांचा जागीच मृत्यू

कोरोनामुळे रेल्वे प्रवास अपडाऊनसाठी बंद असल्याने डोंगरगाव ता.पाचोरा येथील ही कामगार दैनंदिन खासगी वाहनातून मनमाड मालधक्क्यावर मजुरीसाठी येजा करत होते. मजूर ज्या गाडीतन प्रवास करत होते ती क्रुझर गाडी पाचोरा तालुक्यातील हिरापूर गावाजवळ पलटी झाली. या अपघातात होऊन नाना उर्फ भाउलाल भास्कर कोळी (40) विकास जलाल तडवी (29) दोघे रा. डोंगरगाव तर एक मयत मुक्तार तडवी सार्वे यांचा जागीच मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

बुलढाण्यात खाकीला कलंक, पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी, दोघा पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल

बीडमध्ये रुग्णवाहिकेचा अपघात, भरधाव कारची धडक, एक ठार, 3 जखमी, केजमध्ये पिकअप रिक्षा उलटला

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.