नारायण राणेंच्या अटकेचा आदेश काढणारे नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे राज ठाकरेंच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलमध्ये जाऊन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

नारायण राणेंच्या अटकेचा आदेश काढणारे नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे राज ठाकरेंच्या भेटीला
दीपक पांडेय आणि राज ठाकरे.
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 10:01 AM

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक (Raj Thackeray Nashik) दौऱ्यावर आहेत. पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Nashik police commissioner Deepak Pandey) हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलमध्ये जाऊन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. दीपक पांडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले होते.

मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काल बाचाबाची झाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी हॉटेल ssk वर दाखल झाले. पोलीस आयुक्त आणि राज ठाकरे यांच्यात काय चर्चा होणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं आहे.

मनसे कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले त्याच्या समोर मनसैनिकांनी होर्डिंग लावले होते. त्यावर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कारवाई केली. इतकंच नाही तर गुन्हेही दाखल केले.

राज ठाकरे आज आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वीच पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे स्वत: हॉटेलवर आले आणि त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) 22 सप्टेंबरपासून नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी (Nashik Municipal Corporation elections) त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. यापूर्वी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि पक्षांच्या इतर नेत्यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शाखा अध्यक्षांच्या नियुक्तीवर राज ठाकरे मान्यतेचा ठसा उमटिवणार असल्याचे समजते. मनसेमध्ये शाखा अध्यक्ष हे सर्वात महत्त्वाचे पद असून, गेल्या महिन्यापासून या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

फेब्रुवारीत निवडणुका

राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. नववर्षांत पुन्हा एकदा निवडणुकाचा हंगाम असून, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय धुळवडीची रंगत वाढणार आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालकांमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

चर्चा तर होणारचः राज ठाकरे आज नाशिकमध्ये; पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाचे संकेत

साहेब, तुमच्या सोईनुसार 2 तारखेला या, नाशिक पोलिसांची नारायण राणेंना विनंती

राणे म्हणाले, तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान, आता नाशिक पोलीस आयुक्त म्हणतात, ते कोर्टात सांगा!

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिक पोलीस आयुक्त छत्रपती आहेत का? आता पोलीस आयुक्तांकडून उत्तर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.