Nashik-Pune High Speed ​​Railway: नाशिक-पुणे रेल्वेचे काम सुसाट; खेड तालुक्यात जमीन मोजणी पूर्ण, खरेदी दरही ठरले

नाशिक-पुणे (Pune) या सेमी हायस्पीड रेल्वेसाठी नाशिकपाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील 39 गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. यातील 12 गावांत खरेदीचे दरही निश्चित झालेत. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातही जमीन संपादन सुरू आहे. मात्र, सिन्नर तालुक्यातील दरावरून सध्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे समजते.

Nashik-Pune High Speed ​​Railway: नाशिक-पुणे रेल्वेचे काम सुसाट; खेड तालुक्यात जमीन मोजणी पूर्ण, खरेदी दरही ठरले
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 10:11 AM

नाशिक/पुणेः नाशिक-पुणे (Pune) या सेमी हायस्पीड रेल्वेसाठी नाशिकपाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील 39 गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. यातील 12 गावांत खरेदीचे दरही निश्चित झालेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सध्या सुसाट सुरू आहे. सध्या हवेली तालुक्यातले पेरणे, तुळापूर, मांजरी गावात जमीन खरेदी सुरूय. त्यानंतर खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात प्रक्रिया सुरू होणारय. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग (Railway) पुणे जिल्ह्यातील 54 गावांमधून जात आहे. त्यात खेड तालुक्यातील 21, हवेली 12, आंबेगाव तालुक्यात 10 आणि जुन्नर तालुक्यातील 8 गावांचा समावेश आहे. दरम्यान, या रेल्वेमार्गाच्या कामातील सर्वात मोठा निधीचा (Funding) अडथळा दूर झालाय. या कामासाठीच्या आपल्या हिश्शाच्या 32 कोटी निधीला यापूर्वीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या वित्त आयोगानेही आपल्या हिश्शाच्या 20 टक्के पैकी 19.6 टक्के निधीला मान्यता दिली आहे. त्यातही विशेष म्हणजे समभागातून 60 टक्के निधी उपलब्ध आहे.

नाशिकमध्ये नाराजीचे सूर

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी नाशिक जिल्ह्यातही जमीन संपादन सुरू आहे. सिन्नर तालुक्यातील दरावरून सध्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे समजते. तालुक्यातील नायगाव खोऱ्यामधील चार गावांमध्ये जिरायती जमिनीचे दर घोषित करण्यात आले आहेत. त्यात पाटपिंप्री, बारागावपिंप्री, वडझिरे व दातली गावांमध्ये बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 52 ते 68 लाखांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मात्र, हे दर तीन वर्षांत झालेल्या खरेदीच्या पटीत कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. खरे तर या प्रकल्पासाठी शेतजमीन देण्यासाठी यापूर्वीच जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या असंतोषाला आता धार मिळू शकते.

मार्गावर 24 स्थानके

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात हा मार्ग जाणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत काटले जाणार असून, ही रेल्वे प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. दरम्यान, या रेल्वेच्या कामासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये?

– 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग

– रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार

– रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग

– पुढे हा वेग 250 कि. मी. पर्यंत वाढविणार

– पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार

– वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प

– पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी

– 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.