स्मार्ट वॉटर मीटरवरुन नाशिकमध्ये नव्या संघर्षाची नांदी, महापालिकेविरोधात शिवसेना नगरसेवक आक्रमक होणार?

नाशिक शहरात स्मार्ट वॉटर मीटर बसविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे.

स्मार्ट वॉटर मीटरवरुन नाशिकमध्ये नव्या संघर्षाची नांदी, महापालिकेविरोधात शिवसेना नगरसेवक आक्रमक होणार?
Nashik Municipal corporation

नाशिक: स्मार्ट सिटी प्रकल्पातील आणखी एका मुद्यावरुन नाशिकमधील लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांच्यात नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांच्या विरोधात नगरसेवकांमध्ये रोष होता. शुक्रवारी राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि नाशिकचे महापौर यांच्यात बैठक झाल्यानंतर सीईओपदावर सुमंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तो वाद संपुष्टात येत असतानाचं आणखी एका मुद्यावर नगरसेवक आणि महापालिका प्रशासन यांच्यात संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. शहरात स्मार्ट वॉटर मीटर बसवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत. स्मार्ट वॉटर मीटरचा अयशस्वी प्रकल्प नाशिककरांच्या माथी मारला जात असल्याची नगरसेवकांमध्ये चर्चा आहे. (Nashik Smart City Project Smart Water Meter Shivsena Corporators may aggressive against Municipal Corporation)

थेंब थेंब पाण्याचा हिशोब लावण्याचा निर्णय

नाशिक शहरात स्मार्ट वॉटर मीटर बसविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे. धरणातून पाणी उचलण्यापासून ते ग्राहकांच्या घरात पोहोचेपर्यंत थेंब न थेंब पाण्याचा हिशोब लावण्यासाठी स्मार्ट सिटी कडून स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अयशस्वी प्रकल्प माथी मारण्याचा प्रयत्न, नगरसेवकांची चर्चा

स्काडा तंत्रज्ञान प्रणालीचे स्मार्ट वॉटर मीटर बसविण्याच्या प्रस्तावाला स्मार्ट सिटी कंपनीने मंजुरी दिली आहे. परंतु हा अयशस्वी प्रकल्प नाशिककरांच्या माथी मारला जात असल्याची चर्चा नगरसेवकांत सुरू झालेली आहे. नाशिक महापालिका प्रशासन व नगरसेवक यांच्यात चांगलीच जुंपली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येणाऱ्या महासभेत या विषयावर चर्चा करण्याची तयारी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.

कोरोनामुळे स्मार्ट सिटीला प्रकल्पाला मुदतवाढ

सीताराम कुंटे यांनी नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाला मुदतवाढ 2 वर्ष मिळणार असल्याची माहिती यावेळी दिली. कोविड मुळे हा कालावधी वाढवून देण्यात येत आहे. शहराच्या विकासासाठी पालिका प्रशासन, पदाधिकारी यासोबत समन्वय आवश्यक आहे, असं सीताराम कुंटे म्हणाले. ग्रीन फिल्ड प्रस्ताव नगरविकास विभागाकडे, मात्र हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. ABD प्रोजेक्ट मध्ये शहरात अतिरिक्त रस्ते निर्मिती केली जाते. कोरोना मुळं स्मार्ट सिटी कामातील गती कमी झाली. या प्रकल्पात आता विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी समन्वयक असतील.

संबंधित बातम्या:

ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

तिसरी लाट तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक; टास्क फोर्सच्या हवाल्याने अजित पवारांचा इशारा

Nashik Smart City Project Smart Water Meter Shivsena Corporators may aggressive against Municipal Corporation

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI