सफाई कामगारांचा आदर करा, त्यांच्यामुळे आज आपण स्वच्छ शहरात राहातो – भुजबळ

आपण राहात असलेले शहर स्वच्छ ठेवणे हे तेथील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सफाई कामगारांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे आपण सफाई कामगारांचा आदर करायला शिकले पाहिजे त्यांचे उपकार विसरता कामा नाही. असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

सफाई कामगारांचा आदर करा, त्यांच्यामुळे आज आपण स्वच्छ शहरात राहातो - भुजबळ
छगन भुजबळ, पालकमंत्री नाशिक

नाशिक : आपण राहात असलेले शहर स्वच्छ ठेवणे हे तेथील प्रत्येक नागरिकाचे (Citizen) कर्तव्य आहे. शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सफाई कामगारांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे आपण सफाई कामगारांचा आदर (Respect for cleaners) करायला शिकले पाहिजे त्यांचे उपकार विसरता कामा नाही. असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal)  यांनी केले आहे.  येवला नगरपालिकेत स्वच्छ भारत मिशन – स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत 14 व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हॅडकार्टचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, सचिन कळमकर, संतोष खैरनार, सुनील पैठणकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘अस्वच्छतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात’

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अनेक साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुठलंही शहर हे अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्याची आवश्यकता असते. त्यामुळे स्वच्छतेवर भर देण्याची गरज असून, शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जेवढी सफाई कामगारांची आहे तितकीच जबाबदारी नागरिकांची देखील आहे. कोरोनाच्या अतिशय कठीण काळातही स्वच्छतेचे काम सफाई कामगारांनी केले. त्यांचे योगदान अतिशय महत्वाचे असून ते खरे योद्धा असल्याचे कौतुक यावेळी भुजबळ यांनी केले.

भुजबळांनी घेतला पतंग उत्सवाचा आनंद

दरम्यान  यावेळी येवल्यात  छगन भुजबळ यांनी पंतग देखील उडवला. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात पंतग उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थित पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पतंग उत्सवाचा आनंद घेतला. यावेळी उत्सव साजरा करत असताना नागरिकांनी कोरोनाबाबत अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मोहन शेलार, वसंत पवार, दीपक लोणारी, ज्ञानेश्वर शेवाळे, सचिन कळमकर इत्यादी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal | पतंग वाचवता-वाचवता थकलोय, माझ्याच पतंगावर सगळ्यांचा डोळा; भुजबळांची खंत काय?

भाजपचा ओबीसी कार्डचा खेळ, इतक्या आमदारांची कापली तिकीटे

IDEO: फडणवीसांना गोव्याची हवा लागली, त्यांचं अध:पतन झालंय; संजय राऊतांची खोचक टीका

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI