चाहत्यांना शॉक लागण्याचीही पर्वा नाही, गौतमी पाटील हिने घेतला मोठा निर्णय; पहिल्यांदाच असं घडलं

या संपूर्ण गोंधळामुळे कार्यक्रम काही काळ थांबवावा लागला. बरीच वाट पाहूनही गोंधळ काही थांबताना दिसत नव्हता. त्यामुळे गौतमी पाटील हिनेही कार्यक्रमातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.

चाहत्यांना शॉक लागण्याचीही पर्वा नाही, गौतमी पाटील हिने घेतला मोठा निर्णय; पहिल्यांदाच असं घडलं
Gautami Patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 7:20 AM

नाशिक : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील आणि राडा हे समीकरण आता ठरलेलंच दिसतं. गौतमी पाटील यांचा कार्यक्रम जिथे होतो, तिथे राडा आणि हुल्लडबाजी होतेच होते. मग कोणताही जिल्हा असो वा कोणतंही गाव… राडा हा ठरलेलाच असतो. काल नाशिकमध्येही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात असाच राडा झाला. प्रेक्षकांनी कार्यक्रमात प्रचंड हुल्लडबाजी केली. गौतमीच्या अदा पाहण्यासाठी चाहते इतके उतावीळ झाले की हे प्रेक्षक हे मार्केट शेडच्या खांबावर चढले. विजेचा शॉक लागेल याचीही पर्वा केली नाही. त्यामुळे अखेर गौतमी पाटील हिने मोठा निर्णय घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गौतमीने अखेर अर्धा तास आधीच कार्यक्रम गुंडाळण्याचा निर्णय घेतला. गौतमीच्या कार्यक्रमात हे पहिल्यांदाच घडत होतं.

निफाड येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गौतमी पाटील येणार म्हणून या कार्यक्रमाला तुफ्फान गर्दी झाली होती. प्रेक्षकांना पाय ठेवायलाही जागा नव्हती, एवढी प्रचंड गर्दी या कार्यक्रमाला झाली होती. काही प्रेक्षकांनी तर जागा मिळत नाही म्हणून कांदा मार्केटच्या खांबवर चढून कार्यक्रम पाहणे पसंत केलं. खांबावर लाईट लावलेली होती. विजेचा शॉक लागण्याची पर्वा न करता प्रेक्षक खांबावर चढून बसले होते. तर काही तरुण प्रचंड हुल्लडबाजी करत होते. कार्यक्रमाच्या स्थळी असलेले बॅरिकेट्स तोडून हे तरुण आत घुसले आणि त्यांनी खुर्च्यांची अक्षरश: तोडफोड केली. त्यामुळे एकच गोंधळ माजला. लोक सैरावैरा धावू लागले. या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे जमाव अधिकच सैरावैरा धावू लागला.

हे सुद्धा वाचा

अन् महत्त्वाचा निर्णय घेतला

या संपूर्ण गोंधळामुळे कार्यक्रम काही काळ थांबवावा लागला. बरीच वाट पाहूनही गोंधळ काही थांबताना दिसत नव्हता. त्यामुळे गौतमी पाटील हिनेही कार्यक्रमातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. गौतमीने अर्धा तास आधीच कार्यक्रम संपवण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच स्वत:हून गौतमीने अर्धा तास आधी कार्यक्रम संपवण्याचा निर्णय घेतला. एरव्ही पोलीसच येऊन गौतमीला कार्यक्रम बंद करण्याच्या सूचना करतात. किंवा आयोजकांकडून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले जाते. पण काल गौतमीने स्वत:हून अर्धा तास आधी कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गौतमीने हा निर्णय घेतला आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन त्या सुरक्षितपणे बाहेर पडल्या.

दुसरं काही तरी विचारा दादा

दरम्यान, गौतमीने प्रेक्षवर्ग आपल्यासोबत असल्याचा अभिमान असल्याचं विधान केलं आहे. आपल्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून मला प्रेक्षकांचे प्रेम मिळतंय. अजूनही अधिक प्रेम मिळत आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतंय असं त्या म्हणाल्या. माझी बोलण्याची मनस्थिती नसून तरी मी तुमच्यासमोर आली आहे. दुसरं काहीतरी विचारा दादा. प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीवर विचारू नका, असं गौतमी म्हणाली.

सोशल मीडियावर कमबॅक होत असल्याबद्दल छान वाटतंय. प्रेक्षक आपल्या सोबत असून त्याचा अभिमान आहे. लोक आपल्या सोबत असल्याचं खूप छान वाटतंय, असंही तिने सांगितलं. तसेच आपला चोरून व्हिडीओ काढल्याबद्दल कायदेशीर कारवाई चालू असून याबाबत मी बोलणार नाही, असं तिने स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.