AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : छोट्या भाभीची चौकशी, मोठ्या भाभीचे काय?; संजय राऊत यांचा सवाल

ठाकरे गटाचा मोर्चा अत्यंत शिस्तीत जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. संजय राऊत यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. या विषयाचे राजकारण करू नये. माझ्या कार्यकाळात अनेकदा संसदेत ड्रग्सचा विषय मांडला. पण नाशिकचा विषय मांडावा लागेल असं वाटलं नव्हतं.

Sanjay Raut : छोट्या भाभीची चौकशी, मोठ्या भाभीचे काय?; संजय राऊत यांचा सवाल
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2023 | 2:22 PM
Share

चंदन पुजाधिकारी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 20 ऑक्टोबर 2023 : नाशिकमधील ड्रग्स रॅकेटच्या विरोधात आज ठाकरे गटाने प्रचंड मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या या मोर्चात हजारो शिवसैनिक सामील झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. यावेळी संजय राऊत यांनी घणाघाती भाषण करत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आज आम्ही मोर्चा काढलाय. उद्या वेळ आल्यास नाशिक बंद पुकारू, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.

ड्रग्स विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निगालेल्या मोर्चाला संबोधित करताना संजय राऊत यांनी सरकारवर आगपाखड केली. छोट्या भाभीची चौकशी सुरू आहे. मोठ्या भाभीचं काय? हा प्रश्न आहे. मोठ्या भाभीला किती हप्ता मिळत होता? 15 लाख रुपये महिन्याला ड्रग्स माफियाकडून दिले जात होते. या शहरातील आमदारांना काय हप्ता मिळत होता हे पोलीस रेकॉर्डवर आलं आहे. पालकमंत्र्यांना काय मिळत होतं, नांदगावपासून मालेगावपर्यंतचा हिशोब गृहमंत्र्यांना माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

रामकुंडात बुडवा, नाही तर तुडवा

नाशिकच्या ड्रग्स रॅकेटच्या मुळापर्यंत जायचं आहे. नाशिक वाचवायचं आहे. पिढी उद्ध्वस्त होताना पाहायचं नाही. शहरात ड्रग्सचा कोट्यवधीचा व्यवहार आणि व्यापार सुरू आहे. या सर्वांना रामकुंडात बुडवा. नाही तर तुडवा. माझं आव्हान आहे, या अंगावर, शिंगावर घेऊ. काय करणार आहात? अटक करता का? करा. एकदा तुरुंगात गेलो. परत जाईल. मला सांगू नका. शिवसैनिकांना धमकी देऊ नका. नाशिक ड्रग्स मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आज रस्त्यावर उतरलो. उद्या नाशिक बंद करू, असा इशाराच राऊत यांनी दिला.

शिक्षण मंत्री राजीनामा द्या

हा महासागर आहे. या मोर्चाचं एकटोक शालिमार चौकात आहे. एक इथे आहे. काल शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्रक काढलं. विद्यार्थ्यांनी मोर्चात जायचं नाही, असं त्यांनी फर्मावलं. हा विद्यार्थ्यांसाठीचा मोर्चा आहे. याचा अर्थ शिक्षण खात्याला हप्ते मिळतात का? शिक्षण मंत्री राजीनामा द्या. गृहमंत्र्यांना इशारा आहे. नाशिकच्या ड्रग्सच्या प्रश्नावर बोला. इकडची तिकडची गोष्ट सांगू नका. ही गोष्ट तुमच्या घरापर्यंत जाईल. हा साधा मोर्चा नाही. लोकांचा उद्रेक आहे, असं ते म्हणाले.

कुत्ता गोळीचा बंदोबस्त करा

सरकारने कुत्ता गोळी खाल्लीय का? पालकमंत्री कुत्ता गोळी खावून बसलेत का? या कुत्ता गोळीचा बंदोबस्त करा, असं राऊत म्हणाले. या मोर्चाचं हे विराट रूप पाहण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी यायला हवं होतं. तिथे कंत्राटी भरतीवर पत्रकार परिषद घेत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?