AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साधू आले, गेले, मेले माहीत नाही… सयाजी शिंदे यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया, संत, महंत काय म्हणाले?

नाशिकमध्ये 2027मध्ये होणाऱ्या कुंभ मेळाव्याची तयारी सुरु झाली आहे. तपोवन परिसरात साधू-महंतांसाठी 1,150 एकरांवर भव्य साधूग्राम उभारण्यासाठी झाडे तोडण्यात येणार आहेत. ते पाहून साधू आले गेले काही फरक पडत नाही, असं वक्तव्य सयाजी शिंदे यांनी केले होते. आता यावर तिव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

साधू आले, गेले, मेले माहीत नाही... सयाजी शिंदे यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया, संत, महंत काय म्हणाले?
Sayaji ShindeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 29, 2025 | 5:09 PM
Share

नाशिकमधील 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. तपोवन परिसरात साधू-महंतांसाठी 1,150 एकरांवर भव्य साधूग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास 1,800 झाडे तोडली जाणार आहेत. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड संताप वक्त केला जात आहे. वृक्षतोड थांबवण्यासाठी नाशिककर रस्त्यावर उतरले असून, पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, अभिनेते सयाजी शिंदे यांनी “साधू आले गेले काही फरक पडत नाही” असे वक्तव्य केल. त्यांच्या या वक्तव्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनात प्रत्यक्ष जाऊन झाडांची पाहणी केली आणि “इथले एकही झाड तोडू देणार नाही” असा ठाम इशारा दिला. मात्र, त्याच वेळी त्यांनी “साधू आले-गेले तरी काही फरक पडत नाही” असे देखील म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे साधू-महंतांमध्ये नाराजी पसरली आहे. काळाराम मंदिराचे महंत अनिकेत शास्त्री यांनी सयाजी शिंदे यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

महंत अनिकेत शास्त्री काय म्हणाले?

महंत अनिकेत शास्त्री यांनी म्हटले की, वृक्षतोड झालीच नाही पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी संतांनी सांगितले आहे. महाभारतात देखील वनपर्व नावाचा एक पर्व आहे. सरकारने वृक्ष तोडण्याचं हे महा पाप मुळीच करू नये.पर्यावरणाच्या आड येऊन धर्मावर साधू संतांवर जी जहरी टिका ज्येष्ठ अभिनेत्यांनी केली आहे ती दु:खत घटना आहे. जे कोणी कुंभमेळाच बंद झाला पाहिजे म्हणत असेल त्यांच्या बुद्धीची कीव येते. अशा धर्मद्रोह्यांवर तेढ निर्माण करणाऱ्यांवर कटोऱ्यात कठोर कारवाई व्हावी. स्थान महात्म लक्षात घेऊन स्थानाचा पण उद्धार झाला पाहिजे विकास झाला पाहिजे. कुंभमेळा झाल्यानंतर त्या जागेत दहा वर्षात अतिक्रमण होऊ नये कचरा होऊ नये म्हणून सरकारने काही सकारात्मक चांगलं कार्य असेल तर त्याचा स्वागत परंतु वेगळं काही केलं तर त्याचा विरोध.

महंत सुधीर दास काय म्हणाले?

महंत सुधीर दास म्हणाले की, कुंभमेळा काय आहे हे सयाजी शिंदे यांना माहित नाही. 400 वडाची झाड नाशिकमध्ये तोडत नसून त्यांची दिशाभूल करून त्यांना तिथे आण्यात आले असे वाटते. संत महात्मे कुंभमेळा यांच्या वरती व्यक्तिगत टीका सयाजी शिंदे यांनी करू नये. आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु कुंभमेळा आणि संत महात्मे यांच्यावरती त्यांनी बोलू नये. कुंभपरंपरेची त्यांना माहिती नाही श्रीमंहत सुधीरदास महाराज अखिल भारतीय पंचरामानंदी निर्वाणी आखाडा.

सयाजी शिंदे काय म्हणाले?

“झाडे ही आपली आई-बाप आहेत. त्यांच्यावर हल्ला झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची जनभावना समजून घेतली पाहिजे. तपोवनात काढलेले टेंडर्स चुकीचे आहेत. तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जो लढा उभा राहिला आहे, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. साधू आले-गेले तरी काही हरकत नाही, माझा याबाबत अभ्यास नाही, पण झाडे गेली तर नाशिककरांचेच नुकसान होईल. इथले एकही झाड तुटता कामा नये. ही सर्व झाडे वाचलीच पाहिजेत. आपल्याच माणसांनी आपल्याला फसवले तर त्यांना आपले कसे म्हणायचे? हे आपले सरकार आहे की इंग्रजांचे? आपल्याला झाडांच्या वयाची व्याख्याच माहित नाही. भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे, आणि सर्वात जास्त वडाची झाडे भारत सरकारनेच तोडली आहेत. मोठी झाडे जास्त ऑक्सिजन देतात, जास्त कार्बन शोषतात. एका वडावर ५००-६०० प्रजाती अवलंबून असतात. अशी झाडे तोडली तर माफी नाही. आमच्या आई-बापांवर हल्ला झाला तर आम्ही मुले इतकी बुळगी नाही, गप्प बसणार नाही” असे सयाजी शिंदे म्हणाले होते.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.