AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ नेत्यांना शरद पवार यांनी फटकारले; म्हणाले, मी 56 वर्ष संसदेत आहे, मला काही तरी कळत असेल ना?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेपीसीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जेपीसी समितीत सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व राहील. त्यामुळे न्यायाधीशांची समितीच या प्रकरणाच्या चौकशीला योग्य राहील, असं शरद पवार म्हणाले.

'त्या' नेत्यांना शरद पवार यांनी फटकारले; म्हणाले, मी 56 वर्ष संसदेत आहे, मला काही तरी कळत असेल ना?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 09, 2023 | 10:06 AM
Share

चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : अदानी प्रकरणाची चौकशी जेपीसी मार्फत करण्याची गरज नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची चौकशी समिती पुरेशी आहे, असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ते शरद पवार यांचं वैयक्तिक मत असू शकतं. पण आम्ही जेपीसीवर ठाम आहोत, असं स्पष्ट केलं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही जेपीसीमार्फतच अदानी प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी लावून धरली. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शरद पवार जे बोलले ती भाजप आणि एनसीपीची स्क्रिप्ट होती, अशी टीका केली आहे. या सर्वांचा शरद पवार यांनी समाचार घेतला आहे. जो माणूस 56 वर्ष विधीमंडळ आणि संसदेत काम करतोय, त्याला काही तरी कळत असेल ना? अशा शब्दात शरद पवार यांनी फटकारले आहे.

शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पॉइंट असा आहे की पार्लमेंटमध्ये एखाद्या प्रश्नावर पार्लमेंटच्या सदस्यांनी काय बोलायचं यात वेगवेगळी मते असू शकतात. माझं प्रामाणिक मत आहे की चौकशी झाली पाहिजे. पण चौकशीला जेपीसी हे माध्यम योग्य नाही. का योग्य नाही? लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची जी संख्या आहे त्यावर समितीची रचना ठरते. उदाहरणार्थ जर आता 21 जणांची जेपीसी झाली तर भाजपचे 300 लोक लोकसभेत असल्याने भाजपचे 14 ते 15 लोक जेपीसीत येतील. विरोधी पक्षाचे सहाच लोक जेपीसीत असतील. एखाद्या समितीत सहा लोक कितपत प्रभावीपणे काम करतील याची शंका माझ्या मनात आहे, असं शरद पवार म्हणाले.

जेपीसीला विरोध नाही

जेपीसी समिती स्थापन झाली तर त्यात विरोधक अल्पमतात असतील. सत्ताधारी बहुमतात असतील. त्यामुळे त्याचा निर्णय काय येईल हे सांगायची गरज नाही. पण तरीही सर्व विरोधक म्हणत असतील तर जेपीसी ठेवा, तर ठेवा. त्याला माझा विरोध नाही. मला विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेतील कामाला यंदा 56 वर्ष पूर्ण होत आहे. 56 वर्ष जो माणूस विधीमंडळ किंवा पार्लमेंटमध्ये काम करतो त्याला काही तरी माहीत असेल? त्यामुळे आमची सूचना आहे की जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची चौकशी अधिक उपयुक्त ठरेल. पण तरीही काँग्रेस आणि बाकीच्या मित्रांचा जेपीसीचा आग्रह असेल तर आमचा त्याला विरोध नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

सहा ते सात जागा लढवणार

यावेळी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीवरही त्यांनी मोठं भाकीत केलं. मला कर्नाटकातील जी परिस्थिती माहीत आहे. कर्नाटकातील राजकीय परिस्थितीबाबत मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. उद्याच्या निवडणुकीत भाजप पराभूत होईल. काँग्रेस सत्तेत येईल. लोकांना बदल हवा आहे. भाजपला घरी बसवून हा बदल हवा आहे, असं चित्रं आहे, असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकात आम्ही लढणार आहोत. कर्नाटकात एकूण 250जागा आहेत. त्यात पाच ठिकाणी आम्ही उमेदवार दिले तर त्याने भाजपला फायदा होईल असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. मराठी भाषिक हे आमचं मुख्य लक्ष आहे. मराठी भाषिकांना एकत्र कसं करता येईल यावर आमचं लक्ष असेल. आम्ही कर्नाटकात सहा ते सात मतदारसंघापेक्षा अधिक जागा लढवणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.