
Deva Tuch Sang Campaign : ‘देवा तूच सांग’ या कॅम्पेनने ‘देवाभाऊ’ला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिकमध्ये आज एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठा धमाका करण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यात पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचा रोख नेमका कसा असेल याची चुणूक दाखवण्यात आली. आगामी निवडणुकीत पवार पॉवर दाखवतील हाच संदेश यातून देण्यात आल्याची चर्चा आहे.
देवाभाऊ कॅम्पेनला देवा तूच सांगने उत्तर?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाशिक जिल्ह्यात विविध दैनिकात जाहिरात दिली. शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीमुळे झालेल नुकसान, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, युवाना नोकरी या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार? देवा तूच सांग म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचं पक्षाकडून आवाहन करण्यात आलं. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नाशिक मधे भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
पोशिंद्याच्या प्रश्नांसाठी, लढा बळीराजासाठी…
‘भव्य आक्रोश मोर्चा’त मोठ्या संख्येने सहभागी व्हा…
🗓️सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ । सकाळी १०:३० वा. | 📍 गोल्फ क्लब मैदान, नाशिक pic.twitter.com/aOQs2CO3fp
— Supriya Sule (@supriya_sule) September 14, 2025
उद्या आक्रोश मोर्चा
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ नावाने बॅनर लागले आहेत या सगळ्या जाहिरात कॅम्पेनिंग ला आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नाशिक मधील स्थानिक वृत्तपत्रातून उत्तर देण्यात आल आहे कारण आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक दिवसीय शिबीर नाशिक मधे पार पडत आहे आणि उद्या शरद पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात नाशिक मधे भव्य असा आक्रोश मोर्चा होणार आहे या पाश्वभूमीवर आज वृत्तपत्रात देवा तू सांग ना?या आशयाचे जाहिरात देऊन मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर कधी मिळणार असा सवाल या जाहिरातीतून उपस्थित केला आहे
मायबाप विठ्ठलाला साकडे
या शिबिरीला माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अनुपस्थितीत सकाळच्या सत्रात दिसली. तर सध्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवर चांगलेच तोंडसूख घेतले. कुणाला आव्हान देण्याचा आमचा प्रयत्न नाही तर राज्यातील समस्या समोर आणण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये असं शिबीर आयोजित केल्याचे ते म्हणाले. उद्या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. तर स्वयंघोषीत नाही तर परमेश्वराला साकडं घातल्याचं विठ्ठलाला साकडं घातल्याचा सूर आळवला.