Nashik Corona | लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश, मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

राज्यात कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक केले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानानेही मोठा निर्णय घेतलाय. ज्या भक्तांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील त्यांनाच त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. याआधी असाच निर्णय वणी देवस्थानाने घेतला होता.

Nashik Corona | लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश, मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय
nashik corona update
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 8:10 AM

नाशिक : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग वाढत असल्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट गडद होत आहे. तर दुसरीकडे राज्यात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपाचादेखील प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक केले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानानेही मोठा निर्णय घेतलाय. ज्या भक्तांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील त्यांनाच त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. याआधी असाच निर्णय वणी देवस्थानाने घेतला होता.

दोन्ही डोस घेतले तरच मंदिरात प्रवेश 

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर देवस्थानाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. येथे ज्या भाविकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील अशांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. त्यासाठी भक्तांना कोरोना लस घेतली असल्याचे सर्टिफीकेट दाखवावे लागणार आहे. वणी पाठोपाठ त्रंबकेश्वर देवस्थानाने हा मोठा निर्णय घेतला आहे. या बरोबरच 10 वर्षांच्या आतील बालकांना आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वय झालेल्या नागरिकांनाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. 8 जानेवारीपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

तब्बल आठ हजार खाटा सज्ज 

दरम्यान, नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता महापालिकेने खबरदारी घेणे सुरु केले आहे. नाशिकच्या रुग्णालयांमध्ये 8 हजार खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या सर्वाधिक साडेसहाशे खाटा आहेत. त्यात गरज पडल्यास 250 खाटा वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 150, ठक्कर डोम 325, संभाजी स्टेडियम येथे 280 खाटांची सोय करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये 180 खाटा, समाजकल्याण कार्यालय कोविड सेंटर 500 खाटा, मोरी कोविड सेंटर 200 खाटा, अंबर सेंटर 300 खाटा, सातपूर मायको रुग्णालय 50, सावतानगर क्रॉम्प्टन हॉल 60 ऑक्सिजन खाटा आहेत.

इतर बातम्या :

Awadhut Wagh | ‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फासावर लटकवा,’ भाजप नेत्याचे वादग्रस्त ट्विट

धक्कादायक, रत्नागिरीत 15 वर्षीय मुलाला लसीचा ‘डबल डोस’; नेमकं काय घडलं?

School Close : कोरोनाचं वाढतं संकट, सिंधुदुर्ग रत्नागिरीतही शाळा बंद; ऑनलाईन शिक्षण सुरु

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.