अरे 30 वर्षे आम्ही…; उद्धव ठाकरेंकडून भाजपला ‘निर्लज्ज’ असा उल्लेख

Uddhav Thackeray on BJP and Ayodhya Ram Mandir Pranpratistha : जे मला म्हणतात हिंदुत्व सोडलं त्यांना...; ठाकरेंनी टीकाकारांना सुनावलं. नाशिकच्या महाअधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे आक्रमक. भाजपवर शाब्दिक हल्ला. तर टीकाकारांनी कडक शब्दात उत्तर, म्हणाले...

अरे 30 वर्षे आम्ही...; उद्धव ठाकरेंकडून भाजपला 'निर्लज्ज' असा उल्लेख
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 1:18 PM

योगेश बोरसे- प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नाशिक | 23 जानेवारी 2024 : नाशिकच्या राज्यव्यापी महाधिवेशनात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हिंदुत्व सोडत ठाकरे गट काँग्रेससोबत गेल्याची टीका महायुतीकडून करण्यात येते. याला आजच्या या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. आमच्यावर आरोप होतो आम्ही काँग्रेससोबत गेलो. काँग्रेसमय झालो. आम्ही ३० वर्ष भाजपसोबत जाऊन निर्लज्ज भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले कसे होऊ?, असा प्रति सवाल उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना केलाय.

भाजपवर निशाणा

तोतल्यासारखं यांना जनतेच्या न्यायलयात करायचं आहे. सत्ता पाहिजे म्हणून अधिवेशन नाही. राज्याला आणि देशाला टिकवायचं आहे. महाराष्ट्रावर चालून आले त्यांना गाडण्याचा इतिहास लिहायचं आहे. भाजपवाले होते कुठे? हे सर्व माझे शिवसैनिक. तुम्ही त्यांच्यावर खोटे आरोप करत आहेत. राजन साळवी असो की आमचे शिलेदार झुकणार नाही. आमचे लोक तुम्हाला भ्रष्टाचारी वाटत आहेत. तुमचे भ्रष्टाचाराचे पाढे वाचत आहोत, त्याच्या चौकश्या लावा ना. आम्ही लावणार आणि तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पाहिला घोटाळ्यावर बोलताना ठाकरेंचा भाजपवर शाब्दिक वार

मुंबई महापालिकेचा घोटाळा काढताय. पालिकेत कोरोना काळात घोटाळा झाला. काढा. ठाणे पालिकेचा काढा. पुणे काढा, नागपूर नाशिक पालिकेचाही काढा. एवढंच काय पीएम केअर फंडाचाही घोटाळा काढा. काय पीएम केअर म्हणजे काय प्रभाकर केअर फंड नव्हता तो. अरे वसाड्या फंड दे. म्हणे पीएम केअर फंड खासगी आहे. उद्या पंतप्रधान नसणार. तेव्हा तो फंड कुठे नेणार. लाखो करोड जमा केले. ते कुठे घेऊन जाणार. यांचा भ्रष्टाचार चालल्यावर एखाद दिवस बातमी चालते. वरून फोन आला की बंद होते. यांचे जे घोटाळे आहेत. नालायकांनो, रुग्णवाहिकांनो त्यातही घोटाळा केला, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर शाब्दिक वार केला आहे.

… तर आम्हीही धाडी टाकू- ठाकरे

किशोरी ताईंवर बॉडीबॅगचा घोटाळ्याचा आरोप करता. कॅगचा अहवाल आहे, त्यात भाजपच्या राज्यात मृतदेहांवर उपचार केल्याचं दाखवून पैसे काढत आहे. त्या घोटाळ्यावर बोलत नाही. पण इकडे शिवसैनिकांना बदनाम करता. घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडापासून झाली. स्वच्छ असाल तर हिशोब द्याल. स्वच्छच नाही तर हिशोब कसला द्याल. हे ईडीबिडी त्यांच्या घरगड्यांसारखे राहतात. काही घरगडी आम्हाला द्या. आम्हीही धाडी टाकतो, अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.