AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची घोषणा

"शोषित, वंचित आणि मागास समाजाला आत्मसन्मना, अधिकार आणि समान संधी देण्यासाठी जीवन समर्पित केलं. शिक्षण मुक्तीचा मार्ग आहे हे आजही प्रासंगिक आहे. हाच सामाजिक न्यायाचा मजबूत पाया आहे"

Devendra Fadnavis : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची घोषणा
Devendra Fadnavis
| Updated on: Aug 07, 2026 | 11:14 AM
Share

आज बंगळुरुमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11 वं अधिवेशन संपन्न होत आहे. सामाजिक न्याय आणि ओबीसींच्या हक्कांवर यामध्ये व्यापक चर्चा होईल. विविध मान्यावर या अधिवेशनाला मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाला सुरुवात होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आहे. जातीय जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश केला जाईल. त्याशिवाय अधिवेशनातील ठराव राज्य सरकार अंमलात आणेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “ओबीसी महासंघाच्या 11 व्या अधिवेशनासाठी देशभरातून आलेले सर्व समाजातील प्रतिनिधी, माता-भगिनी, युवा सहकारी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी यांना माझा नमस्कार” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “महत्वपूर्ण अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला शुभेच्छा देतो. हे अधिवेशन फक्त विचार-विनिमय करण्याचा मंच नाही, तर सामाजिक न्याय, समरसता आणि राष्ट्रीय निर्माणाला नवीन दिशा देण्याची संधी आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“भारताचा आत्मा विविधतेत आहे. या विविधतेला शक्ती देणारा आधार सामाजिक समरसता आहे. आपल्या महापुरुषांनी भारत निर्माणाचा आपल्याला असा मार्ग दाखवला, ज्यात कुठल्याही व्यक्तीचं मूल्य त्याची जाती, पार्श्वभूमीवर यावर न ठरता प्रतिभा, चरित्र यावर ठरेल. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आधुनिक भारतात सामाजिक क्रांतीचा शंखनाद केला. शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचं सर्वात प्रभावी माध्यम बनवलं. शोषित, वंचित आणि मागास समाजाला आत्मसन्मना, अधिकार आणि समान संधी देण्यासाठी जीवन समर्पित केलं. शिक्षण मुक्तीचा मार्ग आहे हे आजही प्रासंगिक आहे. हाच सामाजिक न्यायाचा मजबूत पाया आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

ज्याने सामाजिक न्याय आणि समान संधी दिली

“क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला, वंचित समाजासाठी शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यावेळी असं करण एक असाधारण साहस होतं. त्यावेळी अनेक अडचणींचा सामना केला पण सामाजिक सुधारणेचं कार्य सोडलं नाही. भारताची पहिली महिला शिक्षिका म्हणून त्यांचं योगदान सैदव प्रेरणास्त्रोत राहिलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला असं सविधान दिलं, ज्याने सामाजिक न्याय आणि समान संधी दिली. शिक्षण, संघटना, संघर्ष हा मंत्र दिला. त्यामुळे कोट्यवधी जीवनात आशेचा संचार झाला. ओबीसी समाज हा भारताच्या विकास यात्रेचा सशक्त आधार आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी