AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रीय महिला आयोगाकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची दखल, चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश

राज्यातील कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याचेही बोललं जात आहे. (NCW take cognizance Pooja chavan case)

राष्ट्रीय महिला आयोगाकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची दखल, चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश
राष्ट्रीय महिला आयोग, पुजा चव्हाण
| Updated on: Feb 13, 2021 | 5:28 PM
Share

मुंबई : राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची  राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. याबाबतच पत्रक काढत राष्ट्रीय महिला आयोगाने याबाबतची माहिती दिली आहे. पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. यानंतर या प्रकरणी अनेक खुलासे झाले आहे. राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याचेही बोललं जात आहे. (National Commission for Women take cognizance Pooja chavan suicide case)

राष्ट्रीय महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आलं होतं. यावेळी याप्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. या विनंतीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत दखल घेतली आहे.

दरम्यान रेखा शर्मा यांनी याबाबतच्या योग्य कारवाईसाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करावी. तसेच या चौकशीचा अहवाल सादर करावा, असे यात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय महिला आयोग म्हणजे काय?

राष्ट्रीय महिला आयोग (National Commission for Women NSW) ही भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने 1992 मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. 1990 च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली. या आयोगाची रचना एक अध्यक्ष आणि पाच सदस्य अशी असते. यातील अध्यक्षाची नेमणूक केंद्र सरकारद्वारे केली जाते. तर पाच सदस्यापैकी एक सदस्य अनुसूचित जाती आणि एक सदस्य अनुसूचित जमातीपैकी असणे आवश्यक असते. (National Commission for Women take cognizance Pooja chavan suicide case)

भारतातील महिलांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करणे, त्यांचे मुद्दे आणि समस्यांवर आवाज उठवणे हा या आयोगाचा मुख्य उद्देश आहे. यात हुंडा, राजकीय, धार्मिक आणि नोकरीच्या ठिकाणच्या महिलांचे प्रतिनिधित्व तसेच श्रमासाठी महिलांचे होणारे शोषण यांचा समावेश आहे. तसेच एखाद्या प्रकरणी पोलिसांकडून महिलांवर होणारे अत्याचार आणि वाईट वर्तणूक याचाही यात समावेश आहे.

आयोगाचे कार्य 

  1. महिलांच्या रक्षणाकरिता करण्यात आलेल्या घटनात्मक आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन त्यावर लक्ष ठेवणे.
  2. महिलांच्याकरिता करण्यात आलेल्या कायद्याचे परीक्षण करुन गरजेनुसार बदल करणे.
  3. महिलांमध्ये सुधारणा करण्याकरिता त्यांच्याशी संबंधित बाबींची अध्ययन आणि संशोधन करणे.
  4. महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्याची दखल घेऊन चौकशी करणे.
  5. महिलांच्या तक्रार आणि समस्यांचे निवारण करण्याकरिता योग्य ती कार्यवाही करणे.
  6. गरजू स्त्रियांना कायदेविषयक बाबी आणि इतर बाबीच्या मदतीसाठी पुढाकार घेणे.
  7. महिलांना समाजामध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळेल यासाठी जनजागृती करणे.

नेमकं प्रकरणं काय?

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.

भाजपकडून थेट वन मंत्र्याचं नाव

भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं या प्रकरणात नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. (National Commission for Women take cognizance Pooja chavan suicide case)

संबंधित बातम्या : 

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडचा शोध सुरु, बीडमध्ये लपल्याची माहिती

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.