AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पडळकर- खोतांच्या जहरी टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर; म्हणाले, असली उंदर पवारसाहेब…

Uttam Jankar on Gopichand Padalkar and Sadabhau Khot : माळशिरसमध्ये आज महायुतीची सभा झालीय. या सभेत बोलताना सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. या टीकेला आता राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात आलं आहे. वाचा सविस्तर बातमी.....

पडळकर- खोतांच्या जहरी टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर; म्हणाले, असली उंदर पवारसाहेब...
Image Credit source: Facebook
| Updated on: Dec 10, 2024 | 3:43 PM
Share

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या चर्चेत आहे. हे गाव सध्या राजकीय घडमोडींचं केंद्र बनलं आहे. मॉक पोलिंगचा निर्णय घेतल्यानंतर हे गाव चर्चेत आलं आहे. या गावात शरद पवार गेले होते. त्यानंतर आज महायुतीच्या नेत्यांनी सभा घेतली. यावेळी भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलं आहे. माळशिरसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तमराव जानकर यांची खोत- पडळकरांवर टीका

असली बारकी- चिरकी 5 उंदीरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात. त्याच्या मागे कोण सगळ्यांना माहिती आहे. अेशी बारीक उंदरे जाऊन तिथं पवारसाहेबांवर टीका करतात. बारक्या उंदरांच्या सुळसुळाटाने काय फरक पडत नाही.कावळ्याच्या शापाने गुर मरत नाहीत. पवार साहेब पवार साहेब आहेत. त्यांनी भल्याभल्यांना लोळवलं आहे. जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोपर्यंत मारकडवाडीमधील आंदोलन सुरूच राहील, असं म्हणत उत्तमराव जानकर यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

राम सातपुतेंवर निशाणा

2029 ला भाजपचाच गुलाल उधळणार, असं राम सातपुते यांनी मारकडवाडीत बोलताना म्हटलं त्याला उत्तमराव जानकरांनी उत्तर दिलं आहे. राम सातपुतेंनी माझ्यासोबत यावं. २०२९ कशाला गुलाल उधळायला मी महिना भरात संधी देतो. मंत्री होईल राज्यात त्यांचे सरकार आहे. मरतोय जगतोय २०२९ फार लांब… असे १०० राम सातपुते मोहिते पाटलांचे बुट पुसायला असतात. त्याने काय बऱळावं.. त्याचा तो स्तर आहे. तो वैफल्यग्रस्त आहे. तो मेंटल हॉस्पिटलमध्ये होता, असं म्हणत जानकरांनी राम सातपुतेंवर निशाणा साधला आहे.

पडळकर- खोत यांची पवारांवर टीका

महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. या मतदारसंघात 100 गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले. बिनचिपळ्याचे नारदमुनी शरद पवारांनी आमच्या गावात येऊन आग लावण्याचा प्रयत्न केला, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. खळं लुटणारा गावाकडे आला. त्यामुळे तुम्ही त्याला बरोबर गावाकडं आणलं. तुमची पोरगी 1 लाखाने निवडून आली. नातू रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली होती का? अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.