पोटासाठी भारतात, नवी मुंबईत राबणाऱ्या नेपाळी कामगारांसाठी लसीकरण कॅम्पची मागणी

भारतात असलेल्या नेपाळी वॉचमन आणि त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा प्रश्न तयार झालाय. त्यामुळेच नवी मुंबईत नेपाळी वॉचमन आणि त्यांच्या कुटुंबांसाठी तातडीने कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन करावे अशी लेखी मागणी माजी नगरसेविका सुजाता सुरज पाटील यांनी केलीय.

  • Updated On - 3:58 pm, Sun, 5 September 21 Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
पोटासाठी भारतात, नवी मुंबईत राबणाऱ्या नेपाळी कामगारांसाठी लसीकरण कॅम्पची मागणी


नवी मुंबई : कोरोनावरील एकमेव उपाय म्हणजे कोरोना विरोधी लसीकरण असल्याचं तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण कोरोना लस मिळवण्यासाठी धडपड करत आहे. अशातच भारतात असलेल्या नेपाळी वॉचमन आणि त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा प्रश्न तयार झालाय. त्यामुळेच नवी मुंबईत नेपाळी वॉचमन आणि त्यांच्या कुटुंबांसाठी तातडीने कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन करावे अशी लेखी मागणी माजी नगरसेविका सुजाता सुरज पाटील यांनी केलीय. त्यांनी याबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन देत ही मागणी केली.

सुजाता पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटलं, “नवी मुंबई महापालिकाकडुन गेल्या पावणे दोन वर्षात करण्यात येत असलेल्या अथक प्रयत्नांमुळे तसेच कोव्हीड रुग्णांचे प्रमाण आटोक्यात आलेले आहे. नागरी आरोग्य केंद्र, महापालिकेची रुग्णालये, महापालिका शाळा, ग्रंथालये, एपीएमसी, ईएसआयएस हॉस्पिटल आदी ठिकाणाहून सुरु असलेल्या लसीकरणाच्या अभियानामुळे अनेकांना लसीकरणाचे डोस मिळणे सुलभ झाले आहे. महापालिका पातळीवर तसेच खासगी स्तरावरही करण्यात येणाऱ्या कोव्हीड लसीकरणात आधारकार्ड बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या नेपाळी वॉचमन आणि त्यांच्या परिवाराबाबत नव्याने अडचण निर्माण झाली आहे.”

“तुटपुंज्या वेतनावर घरोघर धुणीभांडी करणाऱ्या नेपाळी नागरिकांना लसीकरण द्यावं”

“नवी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्या, कंपन्या, कारखाने आदी ठिकाणी नेपाळी बांधव वॉचमनचे तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांची पत्नी, आई, बहीण यादेखील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धुणी, भांडी, लादी सफाईचे काम करीत आहेत. परंतु, ते भारतीय नागरिक नसल्यानं त्यांच्याकडे आधारकार्ड नाही. परिणामी त्यांना प्रशासकीय तसेच खासगी स्तरावर सुरु असलेल्या लसीकरणाचा लाभ घेता येत नाही. वास्तविक पाहता नेपाळी वॉचमनचा सोसायटीतील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांशीच संबंध येतो”, अशी माहिती पाटील यांनी आपल्या निवेदनात दिली.

“घरकाम करणाऱ्या नेपाळी महिलांचा अनेकांशी संपर्क, प्राधान्यानं लसीकरण करा”

“तसेच महिला घरकाम करत असल्याने त्यांचा घरातील महिलांशी, मुलांशी संबंध येतो. त्यामुळे लसीकरणाच्या माध्यमातून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असलो, तरी थेट घराशी, सोसायटी आवाराशी संबंध असणाऱ्या नेपाळी जनसमुदायाचे लसीकरण न झाल्यास एकप्रकारे कोरोना महामारीला आपण शिरकाव करण्यास या माध्यमातून एकप्रकारे निमत्रंणच देत आहोत,” असंही सुजाता पाटील यांनी नमूद केलं. त्यामुळे महापालिकेने नेपाळी वॉचमन आणि त्यांच्या परिवारासाठी 2 दिवसीय स्वतंत्र लसीकरण शिबीर तातडीने आयोजित करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सुजाता पाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली.

हेही वाचा :

राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे 2 डोस पूर्ण करा, उपमुख्यमंत्र्यांची सूचना

पुण्याच्या ग्रामीण भागात वाढला कोरोना, कमी झालेल्या हॉटस्पॉट गावांची संख्या पुन्हा शंभरीपार!

देशात एका दिवसात एक कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण, यात कसला मोठेपणा?; नवाब मलिकांनी भाजपला सुनावले

व्हिडीओ पाहा :

Demand of special Corona vaccination camp for Nepali worker in Navi Mumbai

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI