Corona : खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा, नवी मुंबईत 4 दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोना

चार दिवसात 180 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 1210 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. एकूण 1390 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

Corona : खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा, नवी मुंबईत 4 दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोना
पोलीस

नवी मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे, राज्यातली रोजची रुग्णसंख्या पुन्हा 40 हजारांच्या पुढे गेली आहे, लोकांच्या सुरक्षेसाठी रात्र दिवस तैनात असणाऱ्या, कोरोनाकाळात तुमच्या आमच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या खाली वर्दीलाही कोरोनाचा विळखा वाढतोय, कोरोनाचा प्रादुर्भाव नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. चार दिवसात 180 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 1210 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. एकूण 1390 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 30 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मुंबईतल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्युही झाल्याचे समोर आले आहे.

खाकीला कोरोनाचा मोठा फटका

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी 15 अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर 186 अधिकारी आणि 1243 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. दरम्यान, नवी मुंबई शहर पेालीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंतेची वातावरण आहे. त्याच दरम्यान, गेल्या चार दिवसात ज्या पोलिसांना कोरोना झाला आहे त्यातील काही जणांवर विविध रुग्णालयांमध्ये तर इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. पोलीस आयुक्तालयात चिंतेचे वातावरण आहे.

नवी मुंबईत गेल्या 24 तासांत 2 हजार 337 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 316 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बातमी असे आहे कि कोरोनामुळे एक हि मृत्यू नाही . सध्या नवी मुंबईत अॅक्टिव्ह रुग्ण 11147 आहे . तर नवी मुंबई मध्ये दिवसात रुग्ण दुपट संख्यने वाढत आहे, त्यामुळे नवी मुंबई पालिका बंद असलेली ऑक्सिजन बेड कोविड सेंटर पुन्हा सुरू केली आहेत. कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी पोलिसांना घराच्या बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही, मात्र त्यामुळेच खाकी पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे, फक्त कर्मचाऱ्यांचा नाही तर त्यांच्या कुटुंबियांचाही धोका यामुळे वाढला आहे.

प्रेग्नेंसी रोखण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या कशा पद्धतीने कार्य करतात?

शिंदखेडची भेंडी भाव खातेय लंडनच्या बाजारपेठेत, शेतकऱ्यांच्या एकजूटीचा निर्णय अन् फळही

Nagpur leopards | बिबट्या आला रे..! सहा जनावरे केली फस्त; कन्हान शेतशिवारात दहशत

Published On - 5:13 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI