AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur leopards | बिबट्या आला रे..! सहा जनावरे केली फस्त; कन्हान शेतशिवारात दहशत

कन्हान, पेंच नदी शेतशिवारात बिबट्यानं दहशत माजविली. गेल्या काही दिवसांत सहा जनावरी फस्ट केली. त्यामुळं बिबट्या आला रे आला, अशी हाक एैकू येते.

Nagpur leopards | बिबट्या आला रे..! सहा जनावरे केली फस्त; कन्हान शेतशिवारात दहशत
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 4:54 PM
Share

नागपूर : पारशिवनी तालुक्यातील पिपरी-कन्हान शेत शिवारात संदीप ठाकरे यांच्या शेतात जर्सी गायीचे कालवड बांधले होते. बिबट्याने हल्ला करून शुक्रवारी पहाटे हल्ला करून शिकार केली. या भागात ही सहावी शिकार असल्याचं सांगितलं जातं. यामुळं पिपरी, गाडेघाट, जुनिकामठी, घाटरोहना, गोंडेगाव, टेकाडी, वराडा, वाघोली, एंसबा, नांदगाव, बखारी या कन्हान व पेंच नदी काठालगत असलेल्या गावकर्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं

पिपरी-कन्हान शेतशिवारातील रानी बागीच्याजवळ गुरुवारी सायंकाळी संदीप ठाकरे हे आपल्या शेतात पाळीव जनावरे बांधून घरी आले. दुसर्‍या दिवशी कालवड दिसली नाही. शुक्रवारी शेतात गेल्यावर काही अंतरावर कालवडीचा फडशा पाडलेला दिसला. संदीप ठाकरे यांनी गावकर्‍यांच्या सहाय्याने वन विभाग पटगोवारीचे वनरक्षक एस. जी. टेकाम यांना घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे दिली. वनरक्षकांनी आपले वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्र सहायक ए. सी. दिग्रसे यांना माहिती दिली. दिग्रसे स्वत: व वनरक्षक एस. जे. टेकाम यांनी घटनास्थळी पोहचून निरीक्षण केले. पंचायत समिती पारशिवनीचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा करून अहवाल वनविभागाचे वनक्षेत्र सहायक अधिकाऱ्यांना दिला.

गावकरी का झाले भयभित

कन्हान व पेंचनदी काठालगतच्या गावच्या शेतशिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला. आतापर्यंत बखारी, गाडेघाट, वराडा व पिपरी येथील शेतशिवारात सहा पाळीव जनावरांची शिकार बिबट्यानं केली. यामुळं परिसरातील गावकरी व शेतकर्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने लवकरात लवकर या बिबट्याला पकडण्यात यावे. तसेच पीडित पशुपालक संदीप ठाकरे यांना चोवीस हजार रुपयांची नुकसानभरपाई वनविभागाने त्वरित देण्यात यावी, अशी मागणी मोतीराम रहाटे व पिपरी-कन्हान आणि परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Nagpur | रेल्वे रुळाचे काम करत होत्या महिला; धडधड येणाऱ्या ट्रेनने उडविले, दोन महिला मजूर ठार

Nagpur RSS | रेकी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा, एटीएस, एनआयए करणार; कोण होता रेकी करणारा रईस?

Transportation | नागपुरात साकारलीय एकाच ठिकाण चारस्तरीय वाहतूक व्यवस्था!; नेमका काय आहे प्रकार?

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.