कोरोना नियमांचा भंग, जाब विचारताच शिवीगाळ; हॉटेल मालकाची अधिकाऱ्यांसोबत अरेरावी

पोलिसांनी कारवाई केल्यानंतर एका हॉटेल मालकाने मनपा कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केल्याचा प्रकार खारघर येथे घडलाय. (kharghar hotel owner corona law)

कोरोना नियमांचा भंग, जाब विचारताच शिवीगाळ; हॉटेल मालकाची अधिकाऱ्यांसोबत अरेरावी
या हॉटेल मालकाने पालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली.
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 10:43 PM

नवी मुंबई  : कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे राज्यात वेगवगेळ्या जिल्ह्यात स्थानिक पातळीवर वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत. पनवेल खारघर परिसरातही नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि आस्थापनांवर कडक कारवाई केली जातेय. मात्र, कारवाई केल्यानंतर एका हॉटेल मालकाने मनपा कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केल्याचा प्रकार खारघर येथे घडलाय. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या हॉटेल मालकावर कारवाई केली आहे. (Kharghar hotel owner broke Corona law used abusive words and assaulted Municipal officers)

नेमका प्रकार काय?

खारघर विभागात काल (27 शनिवार) रात्री पनवेल मनपा आणि पोलीस यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात आली. यावेळी खारघऱ परिसरातील एकूण 7 आस्थापने सील केले गेले. त्यानंतर सील केलेली दुकानं आणि हॉटेल्स बंद आहेत की नाही, हे तपासण्यासाठी अतिक्रमण प्रमुख प्रशांत गायकर हे खारघर येथे गेले होते. मात्र यावेळी व्हिलेज टू ट्वेंटी हे हॉटले सील तोडून पुन्हा उघडल्याचे प्रशांत रायकर यांना दिसले. त्यानंतर सील केलेले हॉटेल पुन्हा का उघडले?, याचा जाब विचारण्याचा प्रयत्न प्रशांत रायकर आणि इतर कर्माचऱ्यांनी केला. मात्र, यावेळी त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली.

व्हिलेज 12-20 च्या मालकावर अटकेची टांगती तलवार

या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने IPC 353 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता व्हिलेज 12-20 हॉटेलच्या मालकाच्या अडचणी वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, आपण लॉकडाऊनच्या दिशेने

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर अधिकाऱ्यांची आज (28 मार्च) बैठक झाली. यावेळी कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चर्चा झाली. या बैठकीत राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्याच्या निर्णयावर चर्चा झाली. राज्यात कोरोना रुग्ण वाढत असून आपण लॉकडाऊनच्या दिशेने चाललो आहोत, असा सूर या बैठकीत ठाकरे आणि राजेश टोपे यांचा होता. त्यामुळे रुग्णांची संख्या अशीच वाढली; तर आगामी काळात राज्यात लॉकडाऊन करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे म्हटले जात आहे. सध्या राज्यात आजपासून (28 मार्च) जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 8 ते सकळी 7 वाजेपर्यंत जमावबंदीचा निर्णय लागू असेल.

इतर बातम्या :

सूर्य आग ओकतोय! चंद्रपुरात तब्बल 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तुमच्या शहरात काय स्थिती?

Maharashtra lockdown update : राज्यात लॉकडाऊनची दाट शक्यता, सरकारकडून कोणती खबरदारी?

Corona Cases and Lockdown News LIVE : पुण्यात दिवसभरात 4426 नव्या कोरोनार रुग्णांची वाढ, एकूण 5219 जणांचा मृत्यू

(Kharghar hotel owner broke Corona law used abusive words and assaulted Municipal officers)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.