AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking : नवी मुंबईत राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद; नारायण राणे, आठवले, दरेकर उपस्थित राहणार

मराठा आरक्षणावरुन संपूर्ण राज्यात रान पेटलेलं असताना आता आज नवी मुंबईत राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद पार पडत आहे. (Maratha Golmej Parishad in Navi Mumbai Maratha Reservation)

Breaking : नवी मुंबईत राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद; नारायण राणे, आठवले, दरेकर उपस्थित राहणार
नारायण राणे, रामदास आठवले आणि प्रवीण दरेकर
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 12:53 PM
Share

नवी मुंबई :  मराठा आरक्षणावरुन संपूर्ण राज्यात रान पेटलेलं असताना आता आज नवी मुंबईत राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद पार पडत आहे. या परिषदेला माजी मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते उपस्थित राहणार असल्याने सगळ्यांच्या नजरा या परिषदेकडे लागल्या आहेत. दुपारी एक वाजता या परिषदेला सुरुवात होणार आहे. (Maratha Golmej Parishad in Navi Mumbai Maratha Reservation)

मराठा गोलमेज परिषदेला 3 मोठ्या नेत्यांची उपस्थिती

राज्यातील 42 मराठा संघटना, सकल मराठा समाज तसंच मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramadas Athawale) उपस्थित राहणार आहेत.

दुपारी 1 वाजता मराठा गोलमेज परिषदेला सुरवात

42 मराठा संघटना, सकल मराठा समाज तसंच मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी आणि राजकीय नेते यांच्या उपस्थितीत ठीक एक वाजता नवी मुंबईमध्ये या परिषदेला सुरुवात होणार आहे. या परिषदेत अनेक महत्त्वांच्या विषयांवर चर्चा होणार आहे. तसंच सरकारविरोधात मराठा आरक्षण मुद्द्यांवरुन आक्रमक होण्याची रणनितीदेखील ठरु शकते, अशी शक्यता आहे.

मागण्या काय?

  • सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करावा
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 200 कोटी रुपये द्यावेत
  • आरक्षण लढ्यातील गुन्हे मागे घ्यावेत या प्रमुख मागण्या

भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत ठराव काय?

फडणवीस सरकारच्या काळात प्रयत्नांची पराकाष्ठा करून मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून दिलेले. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. राज्य सरकारने पुन्हा एकदा प्रामाणिक प्रयत्न करून हे आरक्षण पुन्हा मिळवून द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला विशेष सवलती व 3 हजार कोटीचे आर्थिक पॅकेज द्यावे. या सरकारने पदोन्नती आरक्षणा संदर्भातही संभ्रम निर्माण करून ठेवला आहे. हा संभ्रम लवकरात लवकर दूर करावा तसेच लस खरेदीचे वाचलेले 7 हजार कोटी रुपये बारा बलुतेदार, छोटे व्यवसायिक, शेतकरी, कष्टकरी वर्गाला पॅकेज रूपाने द्यावेत,” या मागण्या करत भाजपने ठराव केले.

(Maratha Golmej Parishad in Navi Mumbai Maratha Reservation)

हे ही वाचा :

मराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.