Navi Mumbai Corona | वारंवार कोरोना नियमांचं उल्लंघन, वाशीमधील ‘क्लब नशा’ पब 36 तासात सील

वाशी येथील पाम बीच गॅलरीया मधील क्लब नशा या पबला महापालिकेकडून (Navi Mumbai Club Nasha In Vashi Sealed) सील करण्यात आले आहे.

Navi Mumbai Corona | वारंवार कोरोना नियमांचं उल्लंघन, वाशीमधील 'क्लब नशा' पब 36 तासात सील
Vashi Club Nasha
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 6:52 AM

नवी मुंबई : वाशी येथील पाम बीच गॅलरीयामधील क्लब नशा या पबला महापालिकेकडून (Navi Mumbai Club Nasha In Vashi Sealed) सील करण्यात आले आहे. कोरोना काळात सातत्याने नियमांचे उल्लंघन केल्याने या पबवर ही कारवाई करण्यात आली (Navi Mumbai Club Nasha In Vashi Sealed By NMMC And Police For Violating Corona Rules).

या पबमध्ये शनिवार 6 मार्च रोजी सुरु असलेल्या पार्टीत तरुण-तरुणींकडून दारूचं सेवन करण्यात येत होतं. ज्यामध्ये अल्पवयीन मुलेही असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक बस्त आणि एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगुडे यांनी या पबवर धाड टाकली.

150 ते 200 तरुण-तरुणी ताब्यात

या धाडीत 150 ते 200 तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. आढळलेल्या तरुणांना ताब्यात घेऊन पब मालकावर कारवाई करण्यात आली आहे. एका बाजूला नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई महापालिका जीवाचं रान करुन कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पबमध्ये धांगडधिंगा सुरु होता. त्यांच्याकडून सामाजिक अंतर न पाळणे तसेच मास्क न वापरणे अशा दोन्ही नियमांचे उल्लंघन केले गेले. त्यामुळे एपीएमसी पोलिसांनी कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला होता. याबाबत पोलिसांनी तुर्भे विभाग अधिकाऱ्यांना पत्रही दिले होते त्याआधारे हा पब सील करण्याची कारवाई करण्यात आली. तर पुढील आदेश येईपर्यंत हा पब बंद राहणार असल्याचेही सांगितले.

नवी मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये

मागील आठवड्यापासून पोलीस आणि महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असताना देखील पब मालक अशा करवायांना धजावत नसल्याने आता नवी मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात कोरोनाचे नियम तोडणाऱ्या 500 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मास्क न घालणाऱ्या 10 हजार नवी मुंबईकरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या रडारवर आता नियम तोडणारे पब आणि डान्सबार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळातही पोलिसांकडून अशीच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Navi Mumbai Club Nasha In Vashi Sealed By NMMC And Police For Violating Corona Rules

संबंधित बातम्या :

कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये व्यवस्थित राहत नाहीत? आता भरारी पथकाची नजर ठेवणार

महाराष्ट्रातील तीन शहरं लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, तुमच्या शहरातील कोरोना स्थिती काय?

मुंबईत उडान फाऊंडेशन सरकारी दरात घरच्या घरी कोरोना चाचणी करणार, मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.