दि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार

हर्षल भदाणे पाटील

हर्षल भदाणे पाटील | Edited By: Yuvraj Jadhav

Updated on: Jun 15, 2021 | 8:36 PM

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती देखील दि.बा. पाटील (D.B.Patil) यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी आक्रमक झाली आहे.

दि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार
कृती समितीची बैठक

नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai Airport) नाव देण्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्य सरकारनं नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडं पाठवला आहे. तर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती देखील दि.बा. पाटील (D.B.Patil) यांच्या नावासाठी आक्रमक झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने पनवेलमध्ये बैठक घेतली. दि.बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. (Navi mumbai international airport action committee protest at CIDCO office for demand of D B Patil name gave to airport )

सिडकोला घेराव, लाखभर आंदोलक जमवण्याचा निर्धार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने सिडकोला घेराव घालण्याच्या आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे. त्या आंदोलनात किमान एक लाख व्यक्तींद्वारे घेराव घालण्यात येईल, अशी तयारी कृती समितीकडून करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगले करता येत नसेल तर वाईट गोष्टी करू नये, असं म्हटलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा सल्ला वजा इशारा देण्यात आला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची आज पनेवलमध्ये बैठक झाली. त्या बैठकीतून आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली. बैठकीला दशरथ पाटील, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, संजीव नाईक, महेश बालदी, दशरथ भगत यांच्यासह असंख्य नेते उपस्थित होते. विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी जोरदार लढा सुरू आहे. 24 जूनच्या घेराव आंदोलनात भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, स्थानिक, कृती समिती, संस्था संघटना, विविध राजकीय पक्षाचे गाव ते शहरातील किमान 01 लाख जणांचा समावेश असणार आहे.

दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वात 1984 साली राज्यव्यापी शेतकरी आंदोलन

1984 साली दिबांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील जासई गावी, शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा म्हणून झालेल्या व देशभर गाजलेल्या शौर्यशाली अशा शेतकरी आंदोलनात पाच शेतकर्‍यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या आंदोलनातून प्रस्थापित झालेले साडेबारा टक्के विकसित जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्याचे तत्त्व पुढे संबंध महाराष्ट्रातील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना लागू झाले. नवी मुंबईच्या विकासासाठी तिथल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर जनतेच्या प्रश्नांसाठी दिबांनी संबंध आयुष्य खर्ची घातलं. त्यामुळे त्यांच्या या कर्मभूमीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव देऊन त्यांची स्मृती अजरामर करणे, ही येथील सर्व जनतेची रास्त मागणी आहे, असे दशरथ पाटील यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर 18 गावांचा दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला आरपीआयचा पाठिंबा, रामदास आठवलेंची घोषणा

Navi mumbai international airport action committee protest at CIDCO office for demand of D B Patil name gave to airport

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI