नवी मुंबईत रेल्वे पाससाठी महापलिकेतर्फे 11 रेल्वे स्थानकांवर स्टॉल

कोव्हिड लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना मुंबई महानगर प्रदेशातील लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची 15 ऑगस्टपासून मुभा असेल असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रमाण कार्यप्रणाली (SOP) जारी केली आहे.

नवी मुंबईत रेल्वे पाससाठी महापलिकेतर्फे 11 रेल्वे स्थानकांवर स्टॉल
Navi Mumbai Railway Station
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 11:52 AM

नवी मुंबई : कोव्हिड लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना मुंबई महानगर प्रदेशातील लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची 15 ऑगस्टपासून मुभा असेल असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रमाण कार्यप्रणाली (SOP) जारी केली आहे.

त्यानुसार कोव्हिड लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस होऊन गेले आहेत, अशा नागरिकांना मासिक सिझन पासवर प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. अशा नागरिकांना त्यांच्या फोटोसह असलेला युनिव्हर्सल पास देण्यात येणार असून याव्दारे रेल्वे काउंन्टरवर मासिक सिझन पास घेता येणार आहे. त्यानंतर प्रवास करताना प्रवाशांना मासिक सिझन पाससोबत युनिव्हर्सल पासही सोबत ठेवणे आवश्यक आहे. स्तर 3 आणि त्यापेक्षा अधिक लेव्हल्स ऑफ रेस्ट्रिक्शन स्तराच्या मर्यादेत हा पास वापरता येईल.

रेल्वे स्थानकांमध्ये विशेष मदत कक्ष स्थापन

या प्रमाण कार्यप्रणालीनुसार कोव्हिडचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत हे तपासून प्रमाणित करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाला रेल्वे स्थानकांमध्ये विशेष मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देशीत करण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, सीवूड, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, ऐरोली या 11 रेल्वे स्टेशनवर उदया सकाळी 7.00 वाजेपासून रात्री 11.00 पर्यंत विशेष मदत कक्ष कार्यान्वित असणार आहेत.

मासिक सिझन पास घेण्याची इच्छा असलेल्या पूर्णपणे लसीकरण झालेल्या म्हणजेच कोव्हिड लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांनी आपल्या दोन कोव्हिड डोस घेतलेल्या प्रमाणपत्राची प्रत आणि आधार कार्डची प्रत घेऊन रेल्वे स्टेशनवरील महानगरपालिकेच्या विशेष मदत कक्षाशी संपर्क साधावयाचा आहे. मदत कक्षावरील कर्मचारी लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करुन लसीकरणाची सत्यता पडताळतील आणि त्यावर विशेष शिक्का लावून लसीकरणाचे प्रमाणपत्र युनिव्हर्सल पाससाठी प्रमाणित करतील. ही मुद्रांकीत कागदपत्रे रेल्वे पास काउंन्टरवर दाखविल्यानंतर त्यांना मासिक सिझन पास देण्याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल.

दोन सत्रात 100 हून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक

सदर कार्यवाहीकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 11 रेल्वे स्टेशन्सवर तेथील तिकीट काउंन्टरची संख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांमार्फत विशेष मदत कक्ष उद्या 11 ऑगस्टपासून कार्यान्वित करण्यात येत आहेत. संबंधित विभाग कार्यालयांचे सहआयुक्त तथा विभाग अधिकारी हेच या कार्यवाहीचे विभागीय नोडल अधिकारी असणार असून महापालिका आयुक्त यांचे निर्देशानुसार प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार याचे मुख्य नियंत्रक अधिकारी असणार आहेत. या विशेष मदत कक्षावरील कार्यवाहीकरीता सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 अशा दोन सत्रात 100 हून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय लवकरच युनिव्हर्सल पास देणेबाबत ऑनलाईन ॲपदेखील शासनाच्या वतीने कार्यान्वित करण्यात येत आहे.

कोव्हिडचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत आणि ज्यांना लोकल ट्रेनने प्रवास करावयाचा आहे अशा नागरिकांची युनिव्हर्सल पासविना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका दक्ष असून महापालिका क्षेत्रातील सर्व 11 रेल्वेस्टेशनवर 11 ऑगस्टपासून कार्यान्वित करण्यात येणाऱ्या विशेष मदत कक्षाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईकरांनो, लोकलने प्रवास करायचाय?, मग हे 10 नियम वाचा आणि असा मिळवा पास…!

आजपासून रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीशेजारी महापालिकेचे स्टॉल्स, लोकलचा पास देण्यासाठी तयारी

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.