नवी मुंबई महापालिकेकडून तिसऱ्या लाटेची तयारी, ऐरोली व नेरूळ रूग्णालयांतील आयसीयू बेड्सची आयुक्तांकडून पाहणी

तिसऱ्या लाटेला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वैद्यकीय टास्क फोर्समधील डॉक्टर्स तसेच शहरातील बालरोग तज्ज्ञांशी विचारविनिमय करून त्यानुसार आरोग्य सुविधा निर्मितीची कार्यवाही महानगरपालिकेने सुरू केलेली आहे.

नवी मुंबई महापालिकेकडून तिसऱ्या लाटेची तयारी, ऐरोली व नेरूळ रूग्णालयांतील आयसीयू बेड्सची आयुक्तांकडून पाहणी
नवी मुंबई महापालिकेकडून तिस-या लाटेची तयारी
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 9:45 AM

नवी मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याकडे व त्यादृष्टीने आरोग्य सुविधा निर्मिती करण्याकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर बारकाईने लक्ष देत आहेत. या अनुषंगाने त्यांनी आज महानगरपालिकेच्या ऐरोली व नेरूळ येथील सार्वजनिक रूग्णालयांना भेट देत त्याठिकाणी कोरोना रूग्णांसाठी करण्यात येत असलेल्या प्रत्येकी 200 आयसीयू बेड्स निर्मिती कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई तसेच राजमाता जिजाऊ रूग्णालय, ऐरोलीच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड व माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रावसाहेब पोटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. (Navi Mumbai Municipal Corporation prepares for third wave, inspects ICU beds in Airoli and Nerul hospitals)

12 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश

ऐरोलीच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात सध्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर तसेच नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात सध्या पाचव्या, सहाव्या व सातव्या मजल्यावर आयसीयू कक्ष निर्मितीचे काम सुरू आहे. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करीत आयुक्तांनी 12 ऑगस्टपर्यंत 24 तास तिन्ही शिफ्टमध्ये काम सुरू ठेवून स्थापत्य, विद्युत आणि ऑक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण करावे असे निर्देश दिले. या तिन्ही बाबींबाबत परस्पर समन्वय ठेवून वेळेत कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्यांची आहे. रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी आपल्या रूग्णालयात सुरू असलेले काम योग्य प्रकारे होतेय का याकडे नियमित लक्ष ठेवून खात्री करून घ्यावी व आवश्यक असलेले बदल काम सुरू असतानाच करून घ्यावेत असेही निर्देश आयुक्तांनी दिले. या गोष्टींना समांतरपणे ट्रान्सफॉर्मर बसविणे व त्याविषयीच्या मंजुरीची कार्यवाही देखील 12 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

स्थापत्य व विद्युत साहित्याचीही केली पाहणी

सुविधा निर्मितीची कामे करताना वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा उत्तम असेल याची खात्री करून घ्यावी. तसेच कामही गुणवत्तापूर्ण राहील याची दक्षता घ्यावी आणि त्यातही विशेषत्वाने विद्युत वायरींगची कामे करताना अधिक काळजी घ्यावी असे स्पष्ट करीत आयुक्तांनी स्थापत्य व विद्युत साहित्याची प्रत्यक्ष पाहणी केली. दोन्ही रूग्णालयांमध्ये वरच्या मजल्यांवरील सुरू असलेली कामे 12 ऑगस्टपर्यंत जलदरित्या पूर्णत्वास न्यावीत व नंतर खालच्या मजल्यांवरील कामे सुरू करण्याचे आदेश दिले.

तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आरोग्य सुविधांची निर्मिती

तिसऱ्या लाटेला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वैद्यकीय टास्क फोर्समधील डॉक्टर्स तसेच शहरातील बालरोग तज्ज्ञांशी विचारविनिमय करून त्यानुसार आरोग्य सुविधा निर्मितीची कार्यवाही महानगरपालिकेने सुरू केलेली आहे. त्यामध्ये महानगरपालिकेची नेरूळ व ऐरोली या दोन्ही रूग्णालयांचे कोव्हीड रूग्णालयांच्या दृष्टीने रूपांतरण करण्यात येत असून त्याठिकाणी प्रत्येकी 200 आयसीयू बेड्सची उभारणी केली जात आहे. यामध्ये प्रत्येक रूग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी 80 बेड्सचा पेडियाट्रिक वॉर्ड तसेच कोरोनाबाधित गर्भवती व प्रसूती झालेल्या महिलांसाठी 50 बेड्सचा विशेष वॉर्ड निर्माण केला जात आहे. कोव्हीडच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका नियोजनबध्द पावले उचलत असून महापालिका आयुक्त या अनुषंगाने होणाऱ्या प्रत्येक बाबीकडे काटेकोर लक्ष देत आहेत. (Navi Mumbai Municipal Corporation prepares for third wave, inspects ICU beds in Airoli and Nerul hospitals)

इतर बातम्या

MAHA TET परीक्षेची प्रक्रिया सुरु, अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर

रात्रीच्या अंधारात दबा धरुन बसले, पोलिसांनी केला सिनेस्टाईल पाठलाग, 3 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.