AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dos and Don’t… पोलिसांचे ‘ते’ बॅनर्स नवी मुंबईत झळकले; का होत आहे बॅनर्सची चर्चा ?

संभाव्या गुन्हे टाळण्यासाठी पोलिसांकडून बॅनर्स लावले जात असून घर भाड्याने देताना कोणत्या अटी घालाव्यात, तसेच कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेताना कोणती काळजी घ्यावी तसेच चेन स्नॅचिंग, घरफोडी किंवा चोरी यांसारख्या घटना टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी, यासंदर्भातील अनेक उपाय या बॅनर्सवर लावण्यात आले आहेत.

Dos and Don’t... पोलिसांचे 'ते' बॅनर्स नवी मुंबईत झळकले; का होत आहे बॅनर्सची चर्चा ?
| Updated on: Sep 11, 2023 | 3:19 PM
Share

नवी मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यासंदर्भात जागरूकता पसरवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नवी मोहिम हाती घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर dos and don’t (काय करावे अन् काय टाळावे) याची माहिती देणारे मोठे बॅनर्स (banners) लावण्यास सुरुवात केली आहे. संभाव्य भाडेकरूंना घर भाडे देताना फ्लॅट भाड्याने देताना कोणती अट घालावी तसेच कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीत प्रवेश घेताना कोणती काळजी घ्यावी हे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच चेन स्नॅचिंग, घरफोडी किंवा चोरीच्या इतर घटना, गुन्हे टाळण्यासाठी नागरिकांनी काय जबाबादारी घ्यावी, कशी काळजी घ्यावी हेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

शहरातील विशिष्ट भागात घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत पोलिस विभागाने जाणीवपूर्वक जनजागृती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आत्तापर्यंत जे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, ते कशा स्वरूपाचे होते, त्याचा आम्ही अभ्यास केला आहे. त्यामुळे अशाबाबतीत जनजागृती करण्यासाठी तसेच अशा घटनांची किंवा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी, ते टाळण्यासाठी ही जनजागृती मोहीम आखण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त (डीसीपी झोन 1) विवेक पानसरे यांनी सांगितले.

मे महिन्यातील गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या 558 गुन्ह्यांपैकी 50 गुन्हे हे फसवणूकीचे, तर 87 गुन्हे हे घरफोडीचे आणि 24 गुन्हे चेन स्नॅचिंगचे होते. त्यानुसार फ्लॅट भाडेतत्त्वावर देताना घ्यावयाच्या खबरदारीचे बॅनर कोपरखैरणेच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत, तर फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी किंवा तो विकण्यापूर्वू कोणती कागदपत्रे हवीत त्याची माहिती देणापी पोस्टर्स उलवे येथे लावण्यात आली आहेत.

पोलिसांनी केला होता सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नुकतेच कोपरखैरणे पोलिसांनी एका ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून तिघांना अटक केली होती. त्यामुळे या बॅनर्सचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. “योग्य पडताळणी केल्याशिवाय फ्लॅट्स किंवा प्रॉपर्टी भाडेतंत्त्वावर देण्याच्या समस्येमुळे परिसरात गंभीर गुन्हे घडत आहेत. या बॅनरमुळे रहिवासी आणि गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जागृती निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे”, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय भोसले यांनी सांगितले.

तर नेरुळ नोडमध्ये महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना होणारी फसवणूक आणि घोटाळे अधोरेखित करणारे बॅनर लावले जाणार आहेत. परदेशातील नोकऱ्यांशी संबंधित घोटाळे वाशी आणि बेलापूरमध्ये नोंदवले गेले आहेत, तर रबाळेमध्ये चेन स्नॅचिंग, घरफोडीचे अनेक गुन्हे घडले आहेत. आत्तापर्यंत असे 20 बॅनर लावण्यात आले असून पुढील 15 दिवसांत आणखी बॅनर लावले जातील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, योग्य कागदपत्रे आणि पडताळणी न करता मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्या जाण्याच्या मुद्द्यावर कोपरखैरणे येथील रहिवासी आणि वकील मनीष राय यांनी प्रकाश टाकला. “ या भागात पोलिसांच्या पडताळणीशिवाय फ्लॅट भाडेतत्त्वावर दिले जातात. ही येथील एक समस्या आहे. त्यामुळे यासंबंधी फक्त बॅनर लावून उपयोग नाही, पोलिसांनी त्यापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. यासंदर्भात सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायद्यानुसार मालमत्ता भाड्याने दिली जात आहे की नाही याची रिअल इस्टेट एजंट्सनी खात्री केली पाहिजे, असे ते म्हणाले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.