Sharad Pawar | ‘निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी…’ शरद पवार गटाच्या नेत्याच मोठ वक्तव्य

Sharad Pawar | शरद पवार गटाच्या नेत्याने अत्यंत बोचऱ्या शब्दांचा वापर केलाय. शरद पवार यांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी पर्वा नाही, असं या नेत्याने म्हटलय. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात संघर्ष अधिक वाढू शकतो.

Sharad Pawar | 'निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी...' शरद पवार गटाच्या नेत्याच मोठ वक्तव्य
Shashikant Shinde
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 1:41 PM

नवी मुंबई (रवी खरात) : “शरद पवारांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी पर्वा नाही. निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी अपात्रतेची काळजी करावी” असं मोठ वक्तव्य शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी केलय. त्यांनी अजित पवार गटाचे नेते महेश शिंदे यांच्यावर टीका केली. “आम्ही अपात्र होणार म्हणून स्वप्न बघणारेच अपात्र होतील” अशी महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याला शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं. “शरद पवार यांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी पर्वा नाही. त्यांच्यामुळे राजकारणात आलो. त्यांच्यामुळे पद मिळालं. त्यांच्यासाठी कुठलाही त्याग करण्याची तयारी आहे” असं शशिकांत शिंदे म्हणाले.

“निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी अपात्रतेची काळजी करावी. न्यायालय त्यांना 100 टक्के अपात्र ठरवेल. पण असं झालं नाही, तर जनतेच्या दरबारात ते अपात्र ठरतील. हे मी जाहीररित्या सांगतो, त्यांनी माझ्या अपात्रतेची काळजी करु नये” असं शशिकांत शिंदे म्हणाले. “आम्ही निष्ठावान आहोत. त्याग करण्याची आमची तयारी आहे. पक्ष निष्ठा बाजूला ठेवली. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने निवडून दिलं. त्या जनतेशी गद्दारी करुन खोक्यांसाठी तिथे गेलात. येणाऱ्या निवडणुकी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने उतरेल व तुम्हला पराभूत करेल” असं शशिकांत शिंदे म्हणाले. ‘अशी वेळच येणार नाही’

“पण अशी वेळच येणार नाही. त्याआधी न्यायालय व विधानसभा अध्यक्षच तुम्हाला अपात्र ठरवतील” असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. “आज नवी मुंबईत महाराष्ट सदन उभ राहतय याचा आनंद आहे. माथाडी कामगारांना घर द्या, बोर्डाच्या माध्यमातून द्या. नाशिकच्या कामगारांचे पैसे कपात केले आहेत. माथाडींना कायद्यातून सूट मिळाली पाहिजे” अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली.

Non Stop LIVE Update
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण.
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले.
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले.
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका.
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?.
धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड - मंगलप्रभात लोढा
धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड - मंगलप्रभात लोढा.
ठाण्याच्या जांभळीनाका येथे राहुल गांधी यांची न्याययात्रा प्रवेश करणार
ठाण्याच्या जांभळीनाका येथे राहुल गांधी यांची न्याययात्रा प्रवेश करणार.
Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो या तारखेपासुन सुरु होणार
Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो या तारखेपासुन सुरु होणार.
नमो महारोजगार मेळावा : सुप्रिया सुळेंनी दादांना भेटणे टाळलं....
नमो महारोजगार मेळावा : सुप्रिया सुळेंनी दादांना भेटणे टाळलं.....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....