ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पनवेलमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होणार

येत्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गरजेपोटी घरे कायम करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. (Panvel Houses built by local project victims will be regularized CM Uddhav Thackeray Decision)

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पनवेलमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होणार
Panvel Houses built by local project victims

पनवेल : प्रकल्पग्रस्तांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत तसेच इतर महत्वाच्या मागण्यांबाबत महत्वाची चर्चा आणि त्यावरील निर्णय झाला आहे. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गरजेपोटी घरे कायम करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. पण सिडकोबाधित प्रकल्पग्रस्तांची नैसर्गिकदृष्टया बांधलेली गरजेपोटी घरे आता कायम होणार आहे. त्यामुळे लवकरच नैसर्गिक गरजेपोटी योजना राज्य सरकारच्या वतीने अंमलात येणार आहे. या योजनेच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. (Panvel Houses built by local project victims will be regularized CM Uddhav Thackeray Decision)

योजनेला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी 

नैसर्गिक गरजेपोटी योजना राज्य सरकारच्यावतीने अंमलात येणार आहे. या योजनेला स्व. दि.बा.पाटील नैसर्गिक गरजेपोटी योजना असे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. पनवेल उरण महाविकास आघाडीच्या स्व. दि. बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, काँग्रेसचे सुदाम पाटील, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यबाबतचे निवेदन केले आहे.

दरम्यान नुकतंच पार पडलेल्या बैठकीनंतर येत्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गरजेपोटी घरे कायम करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

सिडकोच्या विरोधातील जनतेचा रोष

गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्वाच्या प्रश्नासह सिडकोच्या विरोधातील जनतेचा रोष पाहायला मिळत होता. मात्र आता पनवेल उरण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेल्या दीड वर्षांपासून सुरू केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलेले वचन आजच्या बैठकीमध्ये सफल झाल्याचे चित्र आहे. तसेच राज्य सरकारच्यावतीने लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Panvel Houses built by local project victims will be regularized CM Uddhav Thackeray Decision)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : सिडको घेराव आंदोलनापूर्वी महत्त्वाचे रस्ते बंद, मुंबई-पुणे वाहतूकीतही मोठे बदल

तर आम्हीही दि.बा. पाटलांच्या नावाचा आग्रह धरू, आंदोलन होणारच; आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे संकेत

बाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI