ना महागडी भेटवस्तू, ना पुष्पगुच्छचा स्वीकार; संजीव नाईक यांनी साजरा केला साधेपणाने वाढदिवस

एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले गणेश नाईक यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संजीव नाईक यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन चार दिवसात ठाण्यातील जागेचा सस्पेन्स मिटणार आहे. त्यामुळे नाईक यांना तिकीट मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ना महागडी भेटवस्तू, ना पुष्पगुच्छचा स्वीकार; संजीव नाईक यांनी साजरा केला साधेपणाने वाढदिवस
sanjeev naik Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 4:09 PM

भाजपचे नेते संजीव नाईक यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या समर्थकांकडून कोणतीही महागडी भेटवस्तू आणण्यास नकार दिला. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या समर्थकांना महागडे पुष्पगुच्छ आणू नका, असंही सांगितलं. त्यामुळे नाईक यांच्या साधेपणाने केलेल्या वाढदिवसाची जिल्ह्यात चर्चा आहे.

भाजप नेते संजीव नाईक यांचा 15 एप्रिल रोजी वाढदिवस होता. एकीकडे इतर नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठ्या हॉटेल्समध्ये स्नॅपी पार्ट्या होतात, महागड्या भेटवस्तूंच्या रांगा लागतात, समर्थकांची गर्दी असते, कोट्यवधी रुपयांच्या हार असतात, उलट संजीव नाईक यांच्या वाढदिवसाला असं काहीच नव्हतं. संजीव नाईक यांनी वाढदिवसानिमित्त ना कुठल्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी दिली, ना समर्थकांकडून महागड्या भेटवस्तू घेतल्या. तर, संजीव नाईक यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात सहभाग घेतला, मंदिरांचे पूजन केले, सुंदरकांडाचे पठण केले, रुद्राभिषेक केला आणि नेत्यांनी वाढदिवस कसा साजरा करावा याचे उदाहरणही घालून दिले. किंबहुना संजीव नाईक यांना पंतप्रधान मोदींच्या साधेपणाची खात्री आहे. मोदी जसा आपला वाढदिवस मोठ्या साधेपणाने साजरा करतात, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन संजीव नाईक देखील वाढदिवसाला हजर राहिले नाहीत.

हार नाही, गुच्छ नाही

भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांचा 52 वा वाढदिवस सोमवारी छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आला. निवडणुकीचा माहोल आणि आचारसंहिता लक्षात घेता वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन संजीव नाईक यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. हार, पुष्पगुच्छ आणि तुतारी न वाजवता साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करूया’ असे आवाहन संजीव नाईक यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं.

पुन्हा नावाची चर्चा

संजीव नाईक हे महाराष्ट्राचे राजकारणी आणि लोकसभेचे माजी खासदार गणेश नाईक यांचे चिरंजीव आहेत. या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून भाजप संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यांच्या साधेपणामुळे संजीव नाईक हे त्यांच्या लोकसभा मतदारसंघात आणि जनतेत इतके लोकप्रिय आहेत की, त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. संजीव नाईक यांनी 1995 ते 2003 इतका प्रदीर्घकाळ नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ठाण्याचे खासदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये संजीव नाईक यांनी राष्ट्रवादीतून ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता 2024 मध्ये सुद्धा भाजप संजीव नाईक यांच्या नावाचा विचार करत आहे.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.