Navi Mumbai Metro | नवी मुंबई मेट्रो मार्ग-1 वर शनिवारपासून चाचणी होणार

सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 वर रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टैंडर्ड ऑर्गनायझेशन (आरएसडीओ) कडून शनिवार 28 अगस्टपासून मेट्रोची ऑसिलेशन चाचणी घेण्यात येणार आहे. आरएसडीओ यांच्याकडून सदर मार्ग क्र. 1 वरील पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानका दरम्यानच्या 5.14 कि.मी. च्या अंतरावर मेट्रोची ऑसिलेशन चाचणी आणि इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी घेण्यात येणार आहे.

Navi Mumbai Metro | नवी मुंबई मेट्रो मार्ग-1 वर शनिवारपासून चाचणी होणार
Navi Mumbai Metro

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 वर रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टैंडर्ड ऑर्गनायझेशन (आरएसडीओ) कडून शनिवार 28 अगस्टपासून मेट्रोची ऑसिलेशन चाचणी घेण्यात येणार आहे. आरएसडीओ यांच्याकडून सदर मार्ग क्र. 1 वरील पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानका दरम्यानच्या 5.14 कि.मी. च्या अंतरावर मेट्रोची ऑसिलेशन चाचणी आणि इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी घेण्यात येणार आहे. या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून ऑसिलेशन चाचणी महत्त्वाची ठरणार आहे.

नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नवी मुंबईतील नोड परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. यांपैकी 11.10 कि.मी. लांबीच्या,तळोजा येथे आगार असलेल्या मार्ग क्र. 1 वर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. या मार्गावरील उर्वरित कामे पूर्ण करण्याकरिता सिडकोकडून महा मेट्रोची नियुक्ती केली असून मुख्य व्हायडक्ट, आगार प्रवेश व्हायडक्ट, आगार आणि कार्यशाळा उभारणीची कामे पूर्ण झाली आहेत.तर स्थानकांची उभारणी, लिफ्ट, उद्धवाहन, फर्निचर आणि प्रणाली ही कामे प्रगतीपथावर आहेत.

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत असणाऱ्या आरएसडीओ यांच्यावर देशातील विविध रेल्वे प्रणालींमध्ये प्रमाणीकरण आणि समन्वय साधण्याची जबाबदारी असते. आरएसडीओ यांच्याकडून सदर मार्ग क्र. 1 वरील पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानका दरम्यानच्या 5.14 कि.मी. च्या अंतरावर मेट्रोची ऑसिलेशन चाचणी आणि इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी 28 ऑगस्ट 2021 पासून घेण्यात येणार आहे.

ऑसिलेशन चाचणी महत्त्वाची

प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या ने चाचपणी म्हणून ऑसिलेशन चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरते. ऑसिलेशन चाचणी पार पडल्यानंतर लवकरच मार्ग क्र. 1 वर पहिल्या टप्प्यात स्थानक क्र. 7 ते 11 आणि दुसऱ्या टप्प्यात स्थानक क्र. 1 ते 11 दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्यापूर्वीचा ऑसिलेशन चाचणी हा महत्वाचा टप्पा आहे. ऑसिलेशन चाचणी पार पडल्यानंतर लवकरच मार्ग क्र. 1 वर दोन टप्प्यांत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे

संबंधित बातम्या :

सिडकोतर्फे विक्री केलेल्या भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरुवात, पात्र अर्जदारांना सिडकोचा दिलासा

CIDCO | कोव्हिड योद्ध्यांसाठी सिडकोची घरे कमी आणि नोंदणी जास्त

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI