AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uran jnpt : उरण-जेएनपीटी मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, तीन उड्डाणपूल खुले

तीन उड्डाणपूल खुले झाल्यानं उरण - जेएनपीटी मार्गावरील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. त्यामुळे अवजड वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकणाने ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीनही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले केले आहेत. करळ फाटा येथे प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांचं कामही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

Uran jnpt : उरण-जेएनपीटी मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, तीन उड्डाणपूल खुले
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 3:49 PM
Share

उरण : तीन उड्डाणपूल खुले झाल्यानं उरण – जेएनपीटी मार्गावरील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. त्यामुळे अवजड वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकणाने ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीनही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले केले आहेत. गव्हाणफाटा येथे अवजड वाहनांमुळे नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

आखणी चार उड्डाणपूल लवकरच खुले

दरम्यान करळ फाटा येथे प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांचं कामही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वाहनचालकांना आणखी दिलासा मिळणार आहे. वर्षभरात 4 वर्तुळाकार पूल वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. जेएनपेटी आणि उरण येथून वर्षभर मोठी मालवाहतूक होत असल्यानं हा मार्ग कायमच वाहतूक कोंडीचा मार्ग बनला होता. त्यातच कित्येकवेळा कंटेनर बंद पडल्यानं वाहतूक कोंडीत जास्त वाढ होत होती.  दिवसाला अंदाजे 4 लाख कंटेनरची वर्दळ या मार्गावर असते. लवकर जेएनपीटी बंदराचं विस्तारीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची ये-जा आणखी वाढणार आहे.

529 कोटींची कामं अंतिम टप्यात

या मार्गावर जवळपास 500 कोटी रुपयांची कामं वेगाने सुरू आहेत. त्यामुळे हा मार्ग आणखी वेगवान होणार आहे. सीबीडी-बेलापूर, उरण आणि पवनवेल थेट या मार्गाला जोडल्यानं प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. उड्डापुलाद्वारे अजूबाजूचे मुख्य मार्ग जोडले गेले असल्याने गोव्याला जाणंही सोपं झालं आहे. 2022 पर्यंत अनेक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होणार असल्यानं भविष्यात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

VIDEO | पंतप्रधान मोदींनी केलं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन; कार्यक्रमात योगींची शेतकरी आंदोलनावर जोरदार टीका

आगामी सुनावणीपर्यंत मलिक सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबियांबाबत काहीही पोस्ट करणार नाहीत- दिवाकर राय

Shashikant Shinde | माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार, शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.