AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवारांच्या पुण्यातील आंदोलनात कार्यकर्ते कुठून आले? भाजपने पुरावाच दिला

रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप नेते नवनाथ बन यांनी गंभीर आरोप केला आहे. नवनाथ बन यांनी व्हिडिओ दाखवत गंभीर आरोप केला.

रोहित पवारांच्या पुण्यातील आंदोलनात कार्यकर्ते कुठून आले? भाजपने पुरावाच दिला
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 11:49 AM
Share

पुण्यात आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनात मंत्री नितेश राणे, संजय राऊत, खासदार ओमराजेंनी हजेरी लावली. काल ओमराजे आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परत जा-परता जा…म्हणत गोंधळ घातल्याचे दिसून आलं. त्यानंतर ओमराजेंनी संवाद साधत विद्यार्थ्यांना शांत केले. याच आंदोलनावरून आता भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. नवनाथ बन यांनी आंदोलनात रोहित पवारांचे 80 टक्के कार्यकर्ते सहभागी झाल्याचा आरोप केला आहे.

भाजप नेते नवनाथ बन म्हणाले,’ रोहित पवार हे पुण्यात विद्यार्थ्यांच्या नावाखाली आंदोलन करत आहे. परंतु रोहित पवार यांचं आंदोलन पॉलिटिकल स्पॉन्सर्ड आहे. हा रोहित पवार यांचा राजकीय स्टंट आहे. त्यांना विद्यार्थ्यांचं काही देणेघेणं नाही. एमपीएसीच्या 20 टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. बाकी 80 टक्के राजकीय कार्यकर्त्यांची घुसखोरी आहे. ते पाच दिवसांपासून आंदोलन करत आहेत, तो केवळ राजकीय इव्हेंट आहे. रोहित पवार यांनी अॅग्रो कंपनीतील कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतलं आहे. काही कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतलं आहे. काही शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आंदोलनात सहभागी आहे. त्यांच्या आंदोलनाला मोजक्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे’.

‘तुम्हाला व्हिडिओमध्ये वाहने दिसत आहे. काही गाड्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आहेत. या सर्व गाड्या बारामतीमधून आल्या आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या वाहनातून कार्यकर्त्यांना आणलं जात आहे. या जवळपास 200 ते 250 गाड्या आहेत. रोहित पवारांनी विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळू नये. हजार गाड्या बारामतीमधून आल्या आहेत. एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनात सहभागी होत नाहीये. रोहित पवारांनी आंदोलन फ्लॉप होत असल्याचे लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी कालपासून अनेक कार्यकर्ते पुण्यात बोलावून घेतले आहेत. यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रोहित पवारांनी पैसे देऊन गर्दी जमवली. काल संजय राऊत, विजय वडेट्टीवार यांचं भाषण झाल्यावर ओमराजे निबांळकरांचं भाषण झालं. ओमराजे निंबाळकरांना परत जा असे सांगणारे एमपीएससीचे विद्यार्थी नव्हते. तर रोहित पवारांचे कार्यकर्ते होते, असे नवनाथ बन पुढे म्हणाले.

Follow Us
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?