Chagan bhujbal : अखेर मंत्रीपदाचा मार्ग मोकळा… कोण आहेत छगन भुजबळ ?
विधानसभा निवडणुकीत महायुतील प्रचंड बहुमताने विजय मिळाला, डिसेंबरमध्ये सरकारही स्थापन झालं. पण महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांपैकी असलेल्या छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाविषयी काहीच हालचाल झाली नाही, त्यांना डावलून अनेकांना संधी मिळाली. मात्र अखेर अनेक महिन्यांनी आता भुजबळांच्या मंत्रीपदाचा मार्ग आता मोकळा झाला असून आज त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ, अनुभवी नेते थगन भुजबळ यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. अनके वर्षांनी त्यांच्या मंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला असून अखेर आज ( मंगळवार, 20 मे) त्यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता राजभवनात छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडेल अशी माहिती समोर येत आहे. त्यांना अन्न व नागरी पुरवठा हे खातं मिळणार असल्याची चर्चा आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं होतं आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री मत्री धनंजय मुंडे यांचा नजीकचा साथीदार वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप करत त्याला अटक करण्यात आली. देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो व व्हिडिओ माध्यमांवर प्रसारित झाले. त्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली होती. परिणामी धनंजय मुंडे यांनी काही महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता. आता आज भुजबळांचा शपथविधी होणार असून आज ते अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार स्वीकारतील अशी माहिती समोर येत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.
कोण आहेत छगन भुजबळ ?
- छगन भुजबळ यांची वैयक्तिक माहिती
- नाव – छगन चंद्रकांत भुजबळ
- जन्म – 15 ऑक्टोबर 1947
- वय – 77 वर्षे
- जिल्हा – नाशिक
- पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
- शिक्षण – मेकॅनिकल इंजिनियरिंग पदविका
छगन भुजबळ यांची कारकीर्द
- शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात
- भुजबळ यांनी मुंबईतील व्ही.जे.टी. आयमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी घेतली. येवला – लासलगाव मतदारसंघातून निवडून आले आहे.
- 1973 मुंबई पहिल्यांदा महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले
- 1973 ते 84 मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता
- 1985 मध्ये मुंबईचे महापौर झाले.
- 1991 मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत मुंबईचे महापौर बनले.
- 1991 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
- 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
- 1985 आणि 1990 अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड
- नोव्हेंबर 1991 मध्ये महसूलमंत्री
- 1995 पर्यंत गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे मंत्री
- एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते
- 18 ऑक्टोबर 1999 रोजी उपमुख्यमंत्री. सोबतच गृह आणि पर्यटन खात्यांचाही कारभार सांभाळला
- एप्रिल 2002 मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड
- एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदी
- 2004 मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड
- नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री
- 2010 रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले.
- महसूल, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम अशा विविध मंत्रालयाचे मंत्रिपद सांभाळले.
- राष्ट्रीय स्तरावर ओबीसी समाजाचे नेते अशी त्यांची ओळख.