सदाभाऊ म्हणाले, सचिनवर टीका करणारे पवार कधी कोणता खेळ खेळलेत का? आता राष्ट्रवादीचे जोरदार उत्तर
क्रिकेटमधील कसोटीपटूंच्या मानधनात वाढ झाली. यामागे कोणाचे कष्ट आहेत, असा सवाल अंकुश काकडे यांनी केला. (NCP Sadabhau Khot Sharad Pawar)

पुणे : “एखाद्या क्रीडा संघटनेचे अध्यक्ष होण्यासाठी तो खेळ खेळलेला असणे गरजेचे नाही. क्रिकेटमधील कसोटीपटूंच्या मानधनात वाढ झाली. यामागे कोणाचे कष्ट आहेत, याची माहिती रयत क्रांती संघटनेचे नेते तथा आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना कशी होणार, शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच असते,” अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली. (NCP criticizes Sadabhau Khot for commenting on Sharad Pawar)
शेतकरी आंदोलनावर भाष्य केल्यानंतर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचे शरद पवार यांनी कान टोचले होते. त्यानंतर शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यावर टीका करत सदाभाऊ खोत यांनी “पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती?,” असे वक्तव्य करत शरद पवार यांचा समाचार घेतला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
अंकुश काकडे काय म्हणाले?
“शरद पवार यांनी कुस्ती, क्रिकेट, कबड्डी, खोखो अशा अनेक संघटनांचे राज्य पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक पदे भूषवली आहेत. ही पदे भूषवताना ते हे खेळ प्रत्यक्ष खेळले नसले तरी त्यांनी खेळांच्या वाढीसाठी जाणीवपूर्वक लक्ष दिले. क्रिकेटमधील कसोटीपटूंच्या मानधनात झालेली वाढ, यामागे कोणाचे कष्ट आहेत, याची माहिती सदाभाऊ यांना कशी होणार?, शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच असते,” असे काकडे म्हणाले.
तसेच, सचिनचा राजकारणासाठी वापर करून घेणे चुकीचे आहे. शरद पवारांनी सचिनला सल्ला देणं यात काय वावगं?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी विरोधकांना केला.
सदाभाऊ खोत काय म्हणाले होते?
सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी “ज्यांना ज्या क्षेत्रातले कळते त्यातलंच त्यांनी बोलावं असं विधान केलं. हे ऐकून थोडा वेळ हसू आलं,” असं रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले होते. तसेच, शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला होता.
इतर बातम्या :
“शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती का?”
सचिनला माझा ‘हा’ सल्ला, शेतकरी आंदोलानावरुन शरद पवारांनी सचिनचे कान टोचले
(NCP criticizes Sadabhau Khot for commenting on Sharad Pawar)
